पुणे ऑगस्ट ०६ : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्मितीची कंपनी असलेल्या सोनालीका ट्रॅक्टरने मागच्या वर्षीच्या तुलनेत ७२% टक्के अधिक ट्रॅक्टर विक्री केली आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीने ४७८८ ट्रॅक्टरची विक्री केली होती तर यावर्षी कंपनीने ८२१९ ट्रॅक्टर विकले आहेत.
जून महिन्यानंतर ताळेबंदीत आलेली शिथिलता आणि पावसाचे वेळेवर झालेले आगमन, तसेच खरिपाचा वाढलेला पेरा यामुळे ट्रॅक्टरची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम जुलैच्या ट्रॅक्टर विक्रीत झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत टाळेबंदी असताना ट्रॅक्टरची विक्री वाढली आहे. त्यावरून हे सिद्ध होते कि, ग्रामीण भाग हा देशाच्या अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेपासून वाचवू शकतो. एकीकडे कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये वाढ झाली आहे, परंतु कंपनीचे एकूण उत्पादन मात्र २०% ने घटले आहे. ताळेबंदीमुळे सुट्या भगांची आवक कमी झाली आहे.
Share your comments