सोमेश्वर साखर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने गाळप केलेल्या उसाला प्रति टन 2867 रुपये एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमधील ही एफ आर पी सगळ्यात जास्त ठरणार आहे.
या गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम 22 ऑक्टोबरला सुरू झाला.सगळे काम सुरळीत होण्यास एक नोव्हेंबर उजाडली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात सोमेश्वर कारखान्याने गाळपाचा दोन लाखटनाचाटप्पा ओलांडला आहे.बर्याच दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये एफआरपी बद्दल संभ्रमावस्था होती. एफआरपी 1 रक मिळणार की दोन टप्प्यात विभागून मिळणारयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. त्याशिवाय सोमेश्वर कारखान्याच्या निर्णयावर बाकीच्या आजूबाजूच्या कारखान्यांचे निर्णय अवलंबून असल्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांचे सोमेश्वर कारखान्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते.
भीमाशंकर कारखान्याने2613 रुपये एफआरपी जाहीर करून याबाबतची कोंडी फोडली होती. त्यानंतर सोमेश्वर कारखान्याचे ही एक रकमी एफआरपी जाहीर करून शेतकर्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.गाळप झालेल्या पहिल्या पंधरवाड्यात ची रक्कम दहा डिसेंबर पर्यंत सभासदांच्या खात्यावर जमा होण्यासाठी कारखाना व्यवस्थापन संपूर्ण प्रयत्नशील आहे.
एकरकमी एफआरपी मुळे कारखान्यावर प्रचंड प्रमाणात आर्थिक ताण येणार असला तरी सभासद मात्र या निर्णयावर समाधानी होणार आहेत.सहकारी कारखान्यांमध्ये 2867 रुपये इतकी एफआरपी सोमेश्वर कारखान्याचे आहे. तरीही सोमेश्वर कारखान्याने एकरकमी दिल्याने अन्य कारखान्यांनाही त्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागणार आह, अशी चर्चा आहे.
( संदर्भ – सकाळ)
Share your comments