पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता रेशन कार्ड आवश्यक
आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्या नंतरच शेतकरी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान योजनानिधीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच या योजनेसाठीनोंदणी करण्यासाठी आता रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आली आहे. आता रेशन कार्डच्याआवश्यकते सोबतच इतर कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी पोर्टल वर अपलोड करता येईल. आता पी एम किसान योजनेचे नवीन प्रणाली अंतर्गतरेशन कार्ड क्रमांकाशिवायनोंदणी करणे शक्य होणार नाही
तसेचआधार कार्ड,बँक पासबुक आणि घोषणा पत्रा ची हार्ड कॉपी जमा करण्याची आता आवश्यकता नाही आता आपण पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावे लागेल. तसेच या नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाआहे.
अशा पद्धतीने करापी एम किसान योजनेसाठी घरबसल्या नाव नोंदणी
- सगळ्यात आगोदर शेतकऱ्यांनी gov.inया संकेतस्थळावर लॉग इन करावे.
- त्यानंतर त्या ठिकाणी दिसणाऱ्या फार्मरकॉर्नरया पर्यायावर क्लिक करावे.
- या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची यावेत यासाठी नोंदणी करू शकतात. या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक,कॅपटचा कोड टाकून तुमच्या राज्य निवडा.
- त्यानंतर प्रोसेस पुढे जाईल.
- तसेचतुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील,शेतीविषयक तपशील विचारला जाईल ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
Share your comments