1. बातम्या

सोयापेंड आयातीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, काही नेत्यांचा आयातीला विरोध

सोयाबीनचे दर आणि सोया पेंड यामध्ये फार जवळचे असे समीकरण आहे. ऑगस्टच्या मध्यंतरी केंद्र सरकारने बारा लाख सोया पेंड आयातीचा निर्णय घेतला होता. त्याचा सरळ सरळ परिणाम सोयाबीनचे दर घसरण यावर झाला होता. अगदी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कमालीचे घसरले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-deshdoot

courtesy-deshdoot

सोयाबीनचे दर आणि सोया पेंड यामध्ये फार जवळचे असे समीकरण आहे. ऑगस्टच्या मध्यंतरी केंद्र सरकारने बारा लाख सोया पेंड आयातीचा निर्णय घेतला होता. त्याचा सरळ सरळ परिणाम सोयाबीनचे दर घसरण यावर झाला होता. अगदी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कमालीचे घसरले होते.

कालांतराने सोया पेंड कमी होता सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र संबंधित देशात निर्माण झाले होते.

 यासंबंधी माहिती अशी की सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनीच सोयापेंडआयातीबाबत थेट विदेशी व्यापार महासंचालक यांना पत्र लिहून सोयाबीनपेंडआयातीसाठी  मुदतवाढीची मागणी केली आहे.त्यामुळे सोया पेंड ची  आयात होणार असे दिसत होते. त्याचा परिणाम थेट सोयाबीन दरावर होऊ लागला आहे. त्यांच्या या भूमिकेला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि प्रतापराव जाधव यांनी विरोध दर्शवला असून यासंबंधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र लिहिले आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ होताच सोयाबीन पेंड च्या आयातीचे महत्व केंद्र पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी पटवून दिले. त्यामुळे जर भविष्यामध्ये सोया पेंड आयात करण्यात आली तर त्याचा थेट परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होईल. त्यामुळे रुपाला यांच्या या भूमिकेला राज्यातील खासदार यांच्याकडून विरोध होऊ लागला आहे.

सोयापेंड आयात आणि महाराष्ट्र सरकार

सोया पेंड आयात केली तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा सोयाबीन दरावर होतो. या पार्श्वभूमीवर  मध्यंतरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले होते. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार सोयाबीन आयातीला परवानगी देणार नसल्याची भूमिका व्यक्त केली होती.परंतु आता केंद्रीय  पशुसंवर्धन मंत्र्यांनीच सोया पेंड आयातीबाबत विदेश व्यापार महासंचालकांना पत्र लिहिल्याने त्यांच्या या भूमिकेला खासदार अमोल कोल्हे त्यांनी थेट विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री तोमर यांना सोया पेंड आयात करू नये अशी मागणी केली आहे.

English Summary: some mp oppose to isuue on soyapend import due to soyabion rate decrease Published on: 03 December 2021, 11:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters