महागाईतून लवकरच दिलासा मिळणार आहे.या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी ही आनंदाची बातमी आहे.
महागाईमुळे लोकांचा खर्च वाढला असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या बचतीवर होत आहे.
क्रूड च्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याची सरासरी किंमत प्रति बॅरल $105 वर राहू शकते. यंदाही मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात किरकोळ चलन वाढ सात टक्क्यावर येण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मे महिन्यातील महागाईचे आकडे 13 जून रोजी समोर येतील. या वर्षी एप्रिल मध्ये आरबीआयने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नक्की वाचा:शेतकरी संकटात; तब्ब्ल २ हजार कोंबड्यांचा मृत्यू
महागाई वाढू नये यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला रेपोदरात अचानक 0.40 टक्क्यांनी वाढ केली. युक्रेनच्या संकट, वस्तूंच्या वाढत्या किमती आणि महागडे क्रूड यामुळे चलन वाढ दबावाखाली राहू शकते,असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचललेली आहेत. सहा महिन्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी केला आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. साखर निर्यातीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. काही पाम तेलाच्या आयातीवर आयात शुल्क कमी करण्यात आले आहे.
नक्की वाचा:राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेंतर्गत मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर...
बार्कलेजचे म्हणणे आहे की पुढील आठवड्यात आरबीआय आपल्या पतधोरणातील चलन वाढीचा अंदाज 6.2 - 6.5 टक्क्यापर्यंत वाढवू शकते.येत्या काही महिन्यात महागाई कमी होईल,असे त्यात म्हटले आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्वीटीजला या आर्थिक वर्षासाठी सरासरी महागाई 6.4 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. मार्च 2023 पर्यंत हे प्रमाण 4.6 टक्क्यावर येऊ शकते.
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई 7.9 टक्क्यावर पोहोचली आहे. मे 2014 नंतरचा हा उच्चांक आहे. किरकोळ चलन वाढ गेल्या चार महिन्यापासून आरबीआयच्या 6 टक्के च्या लक्षापेक्षा जास्त आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्वीटीजचे संजीव प्रसाद म्हणाले, आम्ही देशांतर्गत चलन वाढ पुढील काही महिन्यात सर्वोच्च पातळीवर पोचण्याची अपेक्षा करतो. त्यानंतर ती घसरेल. या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात आम्हाला महागाईपासून दिलासा मिळू शकतो.
नक्की वाचा:कारखानदारांनो राजू शेट्टींनी सुचवलेला उपाय ऐका; ऊस गाळपाबाबत दिला महत्वाचा सल्ला
Share your comments