1. बातम्या

भाजीपाला पिकवणाऱ्यांसाठी वरदान ठरेल सोलर ड्रायर


आपल्याकडे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा माल लगेच विकला  नाही गेला तर तो माल लगेच दुसऱ्या दिवशी कुजतो. त्यामुळे शेतकरऱ्यांना बऱ्याच प्रमाणात नुकसान सोसावे लागते. यासह काही भाजीपाला विक्रेते अधिक प्रमाणात भाज्या विक्रीसाठी बाजारात आणत असतात. परंतु विक्री होत नसल्याने त्यांचेही नुकसान होत असते.

भाज्यांना टिकविण्याकरता बाजारात आता अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये फ्रीज, ड्रायर असे बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यात भाज्या टिकून राहतात पण त्यात ताजेपणा नसतो. त्यातील जीवनसत्त्व कमी होऊ जात असतात. जर आपल्याला त्यातील गुणधर्म ठिकून राहू द्यायची असेल तर भाज्या वाळवणे खूप महत्त्वाचे आहे.  भाज्या वाळवल्या कि त्या अनेक दिवस टिकतात आणि त्या कुठल्याही ऋतूत वापरता येतात. भाज्या वाळवण्याकरिता एयर ड्रायर, स्प्रे ड्राईगं, फ्रीज ड्राईगं, ड्रम ड्राईगं आणि व्हाक्युम ड्राईगं अशा पद्धती वापरण्यात येतात. या पद्धती बऱ्याच खर्चिक आहेत. या पद्धतीत मशीन घेण्याकरिता गुंतवणूक करावीच लागते, परंतु त्या नंतरही बऱ्याच मोठ्या प्रमाणात वीजबिलाचा फटका बसतो. त्यापेक्षा सोलर ड्रायर हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे.

बाजारात अगदी  पाच ते सहा हजारांपासून सोलर ड्रायर उपलब्ध आहेत. यामध्ये इको बॉक्स, फूड ड्रायर टेबल, रॉक, टनेल ड्रायर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक ड्रायरची सुकवाण्याला लागणाऱ्या वेळची आणि वजनाची वेगवेगळी क्षमता असते. सोलर ड्रायरनी सुकवलेल्या भाज्यांमध्ये त्याचे पौष्टिक आणि त्याचे रंग कायम राहत असतात. हे ड्रायर आपण व्यवसायकरिता किंवा घरगुती वापरा करता पण घेवू शकतो.  ज्या भाज्या बाराही महिने उपलब्ध होत नाही त्या सिझनमध्ये घेवून, त्या वळवून आपण बाराही महिने खाऊ शकतो. उद्योगाकरिता म्हटलं तर खूप मोठी बाजारपेठ सध्या उपलब्ध आहे.

सुकवलेल्या भाज्यांचा वापर

सुकवलेल्या भाज्या बऱ्याच गोष्टीमध्ये वापरता येतात. सध्या रेडी टू इट पदार्थाचे मार्केट सध्या खूप जोरावर आहे. आजकाल  मॅगीसोबतच वेगवेगळ्या भारतीय भाज्या, वेगवेगळे पदार्थ रेडी टू इटच्या प्रकारात बाजारात मिळतात. यासर्व पदार्थांना बारीक कापून सुकवलेल्या भाज्या किंवा भाज्यांची पावडर लागते. यामध्ये कांदा, टोमॉटो, गाजर, वाटाणे, गोबी, बटाटे, मशरूम अशा भाज्यांचा वापर होतो.  कसुरी मेथीचा वापर सर्रास सर्वच हॉटेल्समध्ये केल्या जातो. सुकवलेल्या भाज्यांसाठी अमेरिका, कॅनडा, ब्राझील, युरोप आशी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. 
  

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters