1. बातम्या

11 दिवसात 110 कोटींची उलाढाल करत ही बाजार समिती ठरली भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ

सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत असल्याने फार कमी वेळेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांद्याची बाजारपेठ देशात नावारूपास आली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
solapur krushi utpanna bajaar samitee

solapur krushi utpanna bajaar samitee

सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत असल्याने फार कमी वेळेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांद्याची बाजारपेठ देशात नावारूपास आली आहे.

भारतातील सगळ्या बाजार समित्यांचे रेकॉर्ड गेल्या काही दिवसात सोलापूर बाजार समितीने मोडीत काढले. यामध्ये कांद्याची उच्चांकी आवक, मोठ्या प्रमाणातील उलाढाल आणि चांगला भाव मिळवून देण्यात बाजार समिती भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ठरली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगिरीमुळेच महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मागील अकरा दिवसांचा विचार केला तर या दिवसांमध्ये सोलापूर बाजार समितीने महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद बेंगलोर येथील बाजार समित्यांना ही मागे टाकले आहे गेल्या पंधरा दिवसात झालेल्या सोलापूर बाजार समितीतील कांदा आवक याचा विचार केला तर ती 6770 ट्रक च्या माध्यमातून जवळजवळ सहा लाख 75 हजार 750 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.ही आवक  प्रामुख्याने लासलगाव, नासिक, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर  तसेच कर्नाटकातील गुलबर्गा, विजयपूर आणि अफजलपुर या परिसरातून झाली.

त्या माध्यमातून तब्बल एकशे दहा कोटी 93 लाख 96 हजार रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. फार कमी वेळेत भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून सोलापूरनेस्वतःची प्रतिमा बनवली आहे. कांदा बाजारपेठ म्हटली म्हणजे अगोदर डोळ्यासमोर येते ते नाशिक बाजार समितीचे नाव परंतु मागील पाच वर्षाच्या कालावधीत सोलापूर बाजार समितीने देशातील शेतकरी सोलापूर बाजार समिती कडे वळविण्यात मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत देशाच्या कानाकोपऱ्यातून कांद्याची आवक वाढली आहे. या बाजारपेठेत बाजारपेठेतील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे,लिलाव पूर्ण होईपर्यंत दररोज बाजारपेठ 100 कर्मचारी व 100 सुरक्षारक्षक तैनात असतात.

तसेच कांद्याचे दर 100 ते 3000 रुपयांपर्यंत राहिले आहेत. येथील व्यवहार विश्‍वसनीय असल्यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी सोलापूर बाजार समितीत शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी येत असतात. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची काळजी तर घेतली जाते तसेचत्यांचा विश्वास जपण्याचे काम देखील या बाजार समिती प्रशासनामार्फत तसेच संचालक मंडळ करत असते. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते.(संदर्भ-मराठीपेपर)

English Summary: solapur market commiti number one in india in few days in onion incoming Published on: 27 January 2022, 10:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters