1. बातम्या

मोठी बातमी! आता वावरातच केले जाणार माती परीक्षण; काही मिनिटात प्राप्त होणार माती परीक्षणाचा अहवाल

मुंबई: शेती क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते शेतीक्षेत्रात चांगले मोठे घवघवीत यश संपादन करण्यासाठी पीक पद्धतीत मोठा अमुलाग्र बदल करणे अनिवार्य आहे तसेच पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि त्यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी मातीचे आरोग्य देखील सदृढ राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या शेतजमिनीची माती पिकाच्या वाढीसाठी योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी मातीचे परीक्षण करणे खूप महत्त्वाचे ठरते. माती परिक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे तसेच कोणते पोषक घटक आपल्या शेतजमिनीत पुरेशा प्रमाणात आहेत याची पूर्वकल्पना येत असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
soil

त्यामुळे मातीचे परीक्षण केल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक घटकांची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते तसेच त्यामुळे खतांचा अपव्यय वापर देखील टाळणे अधिक सोयीचे होते. म्हणून कृषी क्षेत्रातील जाणकार लोक, मातीचे परीक्षण करण्याचा सल्ला देत असतात. परंतु माती परीक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रयोगशाळेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकरी बांधव माती परीक्षणाचे फायदे जाणून देखील माती परीक्षण करणे टाळत असतात. माती परीक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या शेतजमिनीची माती काही प्रमाणात एकत्रित करावी लागते आणि प्रयोगशाळेत तिची चाचणी करण्यासाठी पाठवावी लागते. तसेच माती परीक्षणाचा अहवाल प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना जवळपास एक हप्ता वाट पाहावी लागते. एवढा सर्व आटापिटा करण्यासाठी शेतकरी बांधवांना मोठी धावपळ करावी लागते तसेच प्रयोगशाळेत एक दोन-तीन वेळा उंबरठे झिजवावे लागतात. 

या बाबी शेतकरी बांधवांना मोठ्या कटकटीच्या वाटत असल्याने शेतकरी बांधव माती परीक्षण करणे नेहमीच टाळतात, यामुळे शेतकरी बांधवांना पिकांपासून अपेक्षित असे उत्पादन प्राप्त होत नाही. मात्र आता शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आता शेतकरी बांधवांना माती परीक्षण करणे अधिक सुलभ होणार आहे. आता शेतकरी बांधवांना माती परीक्षण करण्यासाठी कुठल्याच प्रयोगशाळाचा उंबरठा झिजवावा लागणार नाही, तसेच माती परीक्षणाचा अहवाल प्राप्त करण्यासाठी एक आठवडा विश्रांती देखील घ्यावी लागणार नाही, यामुळे शेतकरी बांधवांचे कार्य जलद गतीने पूर्णत्वास येणार असून माती परीक्षणासाठी होत असणारा मोठा आटापिटा कमी होणार आहे. माती परीक्षणाच्या जुन्या पद्धतीला फाटा देत आता शेतकरी बांधवांना काही मिनिटातच माती परीक्षण आपल्या शेतजमिनीतच करता येणे शक्य होणार आहे. 

शेतकरी बांधवांना आता माती परीक्षण ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे, यासाठी आता बाजारात एक विशिष्ट प्रकारची कीट उपलब्ध झाली आहे. माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना चार ग्रॅम शेतजमिनीची माती या पोर्टेबल किट मध्ये असलेल्या परीक्षानळीत टाकावी लागणार आहे. विशेष म्हणजे या किटला ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे त्यामुळे माती परीक्षण झाल्याक्षणी मोबाईल वरती मातीचा अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकरी बांधवांना माती परीक्षण करण्यासाठी मोठ्या सोयीचे होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच माती परिक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे. एकंदरीत या किटमुळे शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रात जलद पद्धतीने कार्य करता येणे शक्य होणार आहे.

English Summary: soil testing now done in farm Published on: 24 February 2022, 09:09 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters