फळबाग लागवडीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे, एकात्मिक शेती पद्धतीतील या महत्त्वाच्या घटकाकडे शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. नवी फळबाग लागवड करताना मातीच्या विविध घटकांचा विचार व पिकांची योग्य निवड या बाबी महत्त्वाच्या आहेत तसेच शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने माती परिक्षण करून त्यांचे गुणधर्म तपासून मगच लागवडीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
नवी फळबाग लागवड करताना ती अनेक वर्षे उत्पादन देत राहील याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. फळबागेखाली असलेले क्षेत्र, मशागत, लागवडीपासून जोपासना करण्यासाठी सुरुवातीची सुमारे चार ते पाच वर्षे होणारा लाखो रुपयांचा खर्च या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
सर्वच शेतजमिनीत सर्व प्रकारची फळपिके स्थापित होत नसतात. उगवण होणे व वाढ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया सर्वच प्रकारच्या जमिनीत घडून येते. किंबहुना, सुरुवातीची चार ते पाच वर्षे फळझाडे चांगली वाढलेली दिसतात, मात्र केवळ लागवड करणे हा आपला हेतू नसून त्यापासून चांगले उत्पादन मिळणे हे महत्त्वाचे असते.
अयोग्य जमिनीत कालांतराने फळांना बहर किंवा फुलधारणा न होणे, झाडांची योग्य वाढ न होणे, झाडे अकाली वाळणे, त्यांना फळे न लागणे, त्यापासून अपेक्षित उत्पादन न मिळणे आदी समस्या दिसू लागतात. बहरासाठी ताण आवश्यक असणारी फळझाडे उदा. लिंबूवर्गीय (संत्रा, मोसंबी, लिंबू इत्यादी), आंबा, डाळिंब आदी पिकांमध्ये अशा समस्या प्रामुख्याने दिसून येतात.
शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील १३ वा हप्ता
परंतु त्या दिसून येईपर्यंत ४ ते ५ वर्षांचा कालावधी निघून गेलेला असतो, आपली लाखो रुपयांची गुंतवणूक झालेली असते, त्यानंतरही झाडांना फळे का येत नाहीत किंवा अपेक्षित उत्पादन का येत नाही याची शास्त्रीय शहानिशा न करता उपाययोजना करण्यासाठी काही वेळा अनावश्यक खर्च होऊन जातो. पण मुळात आपली जमीन त्या फळांसाठी योग्य आहे की नाही हेच तपासलेले नसते.
पर्यायाने लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली फळबाग काढून टाकण्याची वेळ येते. म्हणूनच नवी फळबाग लागवड करताना कोणतीही घाई करू नये. ती विशिष्ट फळपिकासाठी योग्य आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी त्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्याचा अभ्यास करावा.
एका वेळेस 80 फळे आणि 80 वर्षांसाठी नफा, नारळाची शेती आहे खूपच फायदेशीर
फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल मातीची जमीन असणे आवश्यक आहे. ही खोली कमीत कमी ९० सेंमी ते जास्तीत जास्त १२० सेमी असणे आवश्यक आहे.
केवळ एक फूट खोलीपर्यंतच माती असलेल्या उथळ जमिनीत एक फुटानंतर खालील थरात कठीण खडक लागल्यास पिकाची मुळे खोल जात नाहीत. त्यामुळे पिकाला पोषक अन्नद्रव्ये व पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. अति खोल म्हणजे १२० सेंमीपेक्षा जास्त खोलीपर्यंत निव्वळ मातीच असलेल्या जमिनीसुद्धा फळझाडांसाठी योग्य मानल्या जात नाहीत. अशा जमिनीत खालच्या थरात मुरूम किंवा खडक नसल्यामुळे फळझाडांच्या मुळांची पकड नुसत्या मातीमध्ये घट्ट राहत नाही; आणि मोठी फळझाडे वादळामध्ये उन्मळून पडतात.
मातीतून होणारा पाण्याचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. तो चांगला होत नसल्यास अशा जमिनीत पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त कालावधीपर्यंत वर असते, त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा नियमित होत नाही आणि मातीतून रोगांचा प्रादुर्भाव होतो.
फळझाडे मध्यम ते भारी पोत असलेल्या चिकण, वालुकामय पोयटा किंवा पोयटा आदी विविध प्रकारच्या मातीत घेतली जातात, मात्र बहुतेक फळपिकांसाठी पोयटा किंवा वालुकामय पोयटा या प्रकारचा पोत असलेली माती सर्वोत्तम मानली जाते. फळबागेच्या जागेवर किमान ३ ते ४ फूट वरच्या थरात एकसमान माती असावी, ज्यावर फळझाडे चांगली उगवतील व जगतील.
महत्वाच्या बातम्या;
प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी एक हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण आहे गरजेचे
सांगलीतील बाहुबली कांदा ठरतोय चर्चेचा विषय! एकाच कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो...
Share your comments