अधिक उत्पादनासाठी गरजेचे आहे माती परीक्षण; जाणून घ्या ! परीक्षणांचे फायदे

03 July 2020 07:35 PM By: भरत भास्कर जाधव

 

योग्य बियाणे वापरून, खते वेळेवरु देऊन आपल्या शेतातील उत्पन्न कमी आले आहे का  हे आपल्या सोबतही असेच घडले आहे ना सगळ्या गोष्टी बरोबर असतानाही पिकाचे उत्पन्न कमी होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी ही चिंतेची बाब आहे. पाऊस चांगला, खते, वेळेवर, बियाणे चांगलं मग उत्पन्न का कमी शेतकरी मित्रांनो कधी आपण हा विचार केला आहे, का ? हे घडते. हे होत आहे कारण आपण आपल्या शेतातील माती परीक्षण केले नाही. माती न परीक्षण न करता खतांचा मारा करत राहिल्यामुळे आपल्या जमिनीची पोत खराब होत आहे. तर शेतकरी मित्रांनो सावध व्हा. पेरणी आधी आपल्या शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण करुन घ्या त्यानुसार पिकांची पालट आणि खतांची निवड, आणि मात्रा ठरवा. 

आपल्यातील अनेकांना माती परीक्षण काय भानगड आहे बाबा असं प्रश्न पडला असेल ? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही जदेणार आहोत. तत्पुर्वी आपण माती परीक्षण म्हणजे काय हे जाणून घेऊ. माती परीक्षण केल्यानंतर काय होते , काय करावे लागले याचीही माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने किंवा शेतातील मातीच्या नमुन्यांचे पृथक्करण करुन त्यातील उपलब्ध मुख्य, दुय्यम  व सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण तपासून पिकांचे व खतांचे नियोजन म्हणजे माती परीक्षण होय. शेतीतील  माती हा पहिला घटक असून  उत्पादनवाढीसाठी मातीची सुपीकता चांगली असणे हे  फार महत्त्वाचे आहे. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्ननिर्मितीचा पाया आहे.

वर्षानुवर्ष शेतकरी जमिनीतून विविध पिकांचे उत्पन्न घेत आला आहे. आधी सेंद्रिय पद्धतीने शेती केली जात असे, यामुळे जमिनीची पोत ही व्यवस्थित होती. काही काळानंतर लोकसंख्या वाढली वाढलेल्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची गरज भासू लागली. त्यानंतर कृषी क्षेत्रातील सर्वात मोठा बदल झाला, हरित क्रांती झाल्याने उत्पन्नात वाढ होऊ लागली. अधिक उत्पन्नासाठी आणि अधिक नफ्यासाठी शेतकरी बांधव आपल्या शेतात रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमणात करु लागला. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढताना दिसू लागले पण वर्षानुवर्ष जमिनीवर झालेल्या रासायनिक खतांच्या मारामुळे जमिनीची गुणवत्ता आणि सुपीकता कमी होऊ लागली. आता जमिनीच सुपीकता कमी झाल्याने उत्पन्नाला मर्यादा आली आहे.

 

आपण जेव्हा एखादे पीक घेतो तेव्हा ते पीक जमिनीतून विविध प्रकारचे सुक्ष्म, दुय्यम अन्नद्रव्य जमिनीतून घेत असते. याचा वापर पीक आपल्या वाढीसाठी करुन घेत असते. त्यामुळे मातीतील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होत असते. कमी झालेले प्रमाण भरुन काढण्यासाठी योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा लागतो.  पण आपल्या शेतात कोणते अन्नद्रव्य कमी आहेत, हे आपल्याला माती परीक्षणातून कळत असते. म्हणून माती परीक्षण करुनच आपण पीक व खतांचे योग्य प्रमाणात नियोजन करु शकतो.  परीक्षण केल्यामुळे आपल्याला मातीची कुवत कळते. त्यानंतर आपल्या खतांवर अधिक पैसा खर्च करण्याची गरज नसते. दरम्यान अजून बरीच शेतकरी माती परीक्षणाविषयी जागृक नाहीत. साधऱण ६० ते ७० टक्के लोक माती परीक्षण करत नसल्याचे दिसून येते.  माती परीक्षणामुळे शेतावर लागणाऱ्या खर्चावर लगाम बसत असते. माती परीक्षणाचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ. 

काय आहेत फायदे 

माती परीक्षण केल्याने आपल्याला आपल्या शेताच्या मातीत कोणत्या द्रव्याची पोषणमुल्यांची, जैविक तत्वाची किती मात्रा आहे, हे समजते. त्यानुसार खते आणि इतर पोषक द्रव्यांची  उपाययोजना करता येते. त्या अनुषंगाने पीक उतापादनात वाढ होते.  जमीन आम्लधर्मी आहे का नाही हे कळते. त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते. पिकांना अशा संतुलित खतांचा वापर करता येतो. परिणामी उत्पादनात वाढ होते.  मातीतील सुक्ष्म  व दुय्यम  अन्नद्रव्यांच्या  पुरवठा समतोलपणे  व योग्यरितीने करता येते.

माती परिक्षणामुळे  जमिनीची  सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.  आपण  जसे उत्पादनवाढीसाठी  वेगवेगळ्या तंत्राचा वापर, कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा  वापर करतो. त्याप्रमाणे माती परीक्षण करणे हे अतिशय महत्वाचे आहे.  मोदी सरकार माती परीक्षणासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी एक योजनाही आणली आहे. याचे नाव  Soil Health Card Scheme असे आहे. याच्यामार्फत एग्री क्लिनिक, कृषी उद्यमी प्रशिक्षणासह विज्ञान विषयात द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असलेले उमेदवार आपल्या गावात प्रयोगशाळा सुरु करु शकतील.

soil testing soil testing lab increase production soil farm शेती माती परीक्षण माती परीक्षण प्रयोगशाळा उत्पादन वाढ
English Summary: soil testing is importanat for increasing production; Read benefit of testing

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.