पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच पीक बहरण्यासाठी सर्वात महत्वाचे लागते ते म्हणजे जमिनीचे आरोग्य. जर शेतजमिनीचे आरोग्य चांगले असेल तर पिकाचे उत्पादन भरघोस निघते. ज्या प्रमाणे पिकांची वाढ सुधारण्यासाठी जमीनीचे आरोग्य चांगले लागते त्याचप्रमाणे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय कर्ब, जमिनीचे खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा तसेच उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रमाण आणि सूक्ष्म जिवाणूंची संख्या इ. घटकांवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते.
जमिनिचा सामू :-
जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, चुनखडी तसेच क्षारता या चार गुणधर्माचा भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये समावेश होतो. रासायनिक खतांचा वापर करून आपण जमिनीचे आरोग्य संतुलित ठेवू शकतो हे की आरोग्य समतोल राहिल्याने हेक्टरी जमिनीतून आपण जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन काढतो. जमिनीचा सर्वसामान्य सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असल्यास पिकांना लागणारी जी अन्नद्रव्ये असतात ती जमिमीतून मिळतात जे की ही जमीन पिकासाठी सुपीक असते. सुपीकता असलेली जमीन सर्वच पिकांच्या वाढीसाठी योग्य असते.
सिंचनाचा कार्यक्षम वापर :-
शेतजमिनीला जर अतिरिक्त प्रमाणत जर पाणी दिले तर जमिनीची धूप होते तसेच जमीन पाणथळ होते त्यामुळे शेतजमिनीच्या योग्यतेनुसार च पाणी द्यावे तसेच पिकांच्या गरजेनुसार पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये सुपीकता, तसेच निचऱ्याची क्षमता, पाणी धारण क्षमता व जमिनीची खोली इ. प्रमाणात विविधता आढळते त्यामुळे शेतजमिनीला सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो.
सुपीकता वाढीसाठी उपाययोजना :-
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब हा घटक महत्वाचा आहे. तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय खताबरोबरच जिवाणू खतांचा वापर केला तर जमिनीची सुपीकता चांगल्या प्रकारे टिकवली जाते. जमिनीची धूप टाळण्यासाठी मृद आणि जलसंधारण करावे तसेच जमिनीची कमी मशागत व सपाटीकरण करून सेंद्रिय कर्ब वृद्धीवाढ होते. जमिनीमध्ये आंतरपीक पद्धत वापरावी, आच्छादन करावे. पीक काढून झाल्यानंतर जे अवशेष राहतात ते अवशेष न जाळता जमिनीत गाढावे. शेतजमिनीत नैसर्गिक खते जसे शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, प्रेसमड, कोंबडी खत, लेंडी खत, पाचट खत यांचा वापर करावा.
अशी द्या पशूसंगोपनाची जोड :-
शेतीच्या बांधावर गिरिपुष्प तसेच वारा गतिरोधन व हिरवळीची पिके लावावी. शेतजमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिवाणू खते तसेच रासायनिक खतांचा समतोल राखणे गरजेचे आहे. जमिनीची सुधारणा करण्यासाठी क्षार, चोपण व विम्ल या भुसुधारकांचा वापर करावा व शेताची धूप टाळण्यासाठी जल व मृदासंधारण करणे गरजेचे आहे.
Share your comments