यावर्षी ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने असेच अवेळी झालेला पाऊस तसेच कारखान्यांची विस्कळीत ऊसतोडणी यंत्रणा इत्यादी कारणांमुळे जानेवारी चा तिसरा आठवडा सुरू झाला तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडणी चा कार्यक्रम अजूनही मागील वर्षाच्या जूनच्या पहिल्या सप्ताहातील म्हणजे जवळजवळ वीस महिन्यानंतर सुरू असल्यामुळे ऊस तोड होण्यास विलंब होत आहे.
या वर्षी सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कारखान्यांचा गाळप हंगाम हा वेळेत सुरू झाला होता परंतु बऱ्याच कारखान्यांनी पुर्ण एफ आर पी,तर काही कारखान्यांनी 80 20 चा फॉर्म ला स्वीकारत ऊस बिले काढले आहेत. यावर्षी सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण मान तसेच खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामात गाळपासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. उत्पन्नात वाढ व लवकर तुटावा यासाठी आडसाली ऊस घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
जेव्हा ऊसतोडणी हंगाम सुरू झाला त्यावेळी जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणी यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे पावसामुळे वाया गेलेले दिवस तसेच आणि कारखान्यांची विस्कळीत झालेली तोडून यंत्रणेचा परिणाम दिसू लागला असून संथगतीने सुरू आहे. सध्या जिल्ह्यात 16 पैकी 13 कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे.
त्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडणी कार्यक्रम जूनच्या दुसऱ्या सप्ताहातील सुरू असल्यामुळे तसेच पाऊस व विस्कळीत यंत्रणेमुळे ऊस तोडणी विलंब होत असल्याने उसाला तुरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात,वजनात घट होण्याची भीती वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Share your comments