हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षच्या बागा कोमात होत्या त्यामुळे यंदाच्या वर्षी द्राक्षाची निर्यात सुद्धा जास्त झालेली नाही. द्राक्ष उत्पादकांना यंदाचे वर्ष नुकसानीचे वर्ष म्हणून ठरले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून ८ हजार टन द्राक्षाची निर्यात झालेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांना खूप परिश्रम घ्यावे लागले आहे तेव्हा कुठे निर्यातीला सुरुवात झालेली आहे. परकीय चलन द्राक्ष उत्पादकांना मिळू लागले आहे. चीन देशाला नोऱ्यात झाली नसल्याने द्राक्षे उत्पादकांना चांगलाच आर्थिक।फटका बसलेला होता. सध्या द्राक्ष निर्यातीचा हंगाम अंतिम टप्यात आहे जे की अंतिम टप्यात द्राक्षाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्याना आहे.
शेतकऱ्यांना अपेक्षा दरवाढीची :-
वातावरणातील लहरीपणामुळे द्राक्षावर विपरीत परिणाम घडलेला आहे जे की दरवर्षी जसे द्राक्षाला दर भेटतात तसे यंदा द्राक्षाला दर भेटले नाहीत. तर अगदी अंतिम टप्यात असताना राज्यात ढगाळ।वातावरण तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरवर्षी मार्च - एप्रिल महिन्यात द्राक्षाच्या मागणीत वाढ होते. आता ऊन कडक पडले तर द्राक्षाच्या फळात गोडवा निर्माण होणार आहे त्यामुळे द्राक्षच्या दर्जा ही सुधारेल तसेच चीनमध्ये निर्यात झाली की अपेक्षित असे द्राक्षाला दर ही मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
द्राक्ष आयातबाबात चीनच्या काय होत्या अटी :-
चीन ने द्राक्ष आयात करण्याआधी काही अटी घातल्या होत्या जे की द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योजकांनी कोरोना पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी हे सांगितले होते. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच यंत्रणा पाठवायचे ठरवले आहे. परंतु अपेडाने असे न केल्यामुळे द्राक्षाची निर्यात थांबली होती. मात्र आता पुन्हा निर्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरयांना परकीय चलन ही भेटेल आणि आर्थिकरित्या परिस्थिती सुद्धा सुधारेल अशी शक्यता आहे.
यामुळे रखडली चीनची निर्यात :-
चीनमध्ये द्राक्ष ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हंगामाच्या सुरुवातीला यंदा चीन ने अपेडकडे काही नियम व अटी घातल्या होत्या जे की या अटी आणि नियमांची जो पर्यंत पूर्तता होत नाही तो पर्यंत द्राक्षे निर्यात होणार न्हवती. परंतु अपेडाने या नियमांचे पालन केले नसल्यामुळे हंगामाच्या मध्यावर च सर्व निर्यात थांबली आणि तिथून पुढे एक ही चीन च्या मार्गावर ट्रक दिसला नाही. आता ही समस्या दूर झाली असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील पहिला द्राक्षचा ट्रक चीनकडे प्रस्थान झालेला आहे.
Share your comments