बीड
बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी पाहणी केली आहे. शंखी गोगलगायमुळे पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ पिकाचे पंचनामे केले जावेत, असे आदेश कृषिमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर गोगलगायींना नष्ट करण्यासाठी लागणारी उपयुक्त औषधे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी विभागाला दिली जावेत, अशाही सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मराठवाड्याच्या बहुतांश भागात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर त्याच्यामागे सरकार ठामपणे उभे राहिली, असे आश्वासनही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उगवलेले सोयाबीन पीक देखील गोगलगायमुळे नष्ट होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतेत सापडले आहेत.
दरम्यान, काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री साहेब आम्ही जगायचं कसं? पाऊस नाही, दुबार पेरणी केली, दुबार पेरणीनंतर गोगलगायचा प्रादुर्भाव, आता तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? असं गाऱ्हानं काही शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडले आहे.
Share your comments