छत्रपती संभाजीनगर
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातील मोसंबी हब म्हणून ओळख आहे. पण मागील काही दिवसांपासून या भागातील मोसंबी उत्पादक गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. तसंच मोसंबी गळती सुरु असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मोसंबीच्या झाडावर असंख्य गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे.
गोगलगायी झाडांची साल खातात आणि त्यामुळे झाडांचे नुकसान होते. झाड पूर्णपणे वाळून जातं आणि मग झाडांची फळ आधार टिकत नाही. यावर नेमका काय उपाय करावा हे अजूनही या भागातील शेतकऱ्यांना समजले नाही. त्यामुळे शेतकरी घरगुती उपाय करुन गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यावेळी गोगलगायीच्या प्रादुर्भाव बद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून साधारणता गोगलगायीचा प्रादुर्भाव मोसंबी बागेवर सातत्याने होत आहे. शंखी गोगलगायी असल्यामुळे जमीन देखील नापीक होण्याची शक्यता त्याच्यापासून तयार झालेली आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मोसंबीवर गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे. तरी आतापर्यंत एकदाही कृषी विभागाचा एकही अधिकारी आमच्या भागात आला नाही. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले नाही. कृषी विभाग येऊन पाहत नाही, कोणी सांगत नाही, कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही, असाही आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
Share your comments