1. बातम्या

कौशल्य विकास-मुद्रा बँकेची सांगड घालून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे

मुंबई: कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून युवकांना स्वयंरोजगारासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करावे, त्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून युवकांना स्वयंरोजगारासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करावे, त्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अर्थमंत्र्यांनी राज्यातील सात जिल्ह्याच्या रोजगार संधींचा आढावा घेतला. यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्ह्यातील नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि त्या अनुषंगाने तिथे सुरु करता येणारे रोजगार यासंबंधी केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी त्यांचे सादरीकरण केले. या सात जिल्ह्यात रोजगार संधींची वाढ करताना ते पर्यावरणस्नेही,भौगोलिक गरजांची पूर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे असावेत, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सात जिल्ह्यांमध्ये कृषी, पणन, वनोपज, कृषी प्रक्रिया केंद्र, दुग्ध-मत्स्य व्यवसायपर्यटन, माहिती तंत्रज्ञान, निसर्ग पर्यटन यासह अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत. चंद्रपूर येथे फ्लाय ॲशपासून विटा बनवण्याचा उद्योग अधिक वेग घेऊ शकतो. या सर्व क्षेत्रातील रोजगार संधींचा विचार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आणि त्यादृष्टीने कौशल्य विकासाची गरज या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात, नियोजन विभागाने यासाठी समन्वयाने काम करावेरोजगार संधींची उपलब्धता ही कालबद्ध पद्धतीने केली जावी, ती इतरांना दिशादर्शक असावी असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

English Summary: Skill Development and Mudra Bank collaboration for organizing employment fairs Published on: 09 October 2018, 08:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters