आधीच हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी त्रस्त असतांनाच काही मानवनिर्मित संकट यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
आधीच एवढे मोठे संकट शेतकऱ्यांवर येत असताना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे लातूर तालुक्यातील भिसे वाघोली शिवारातील जवळजवळ साठ एकरातील ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली आहे. एका शॉर्टसर्किट च्या ठिणगीमुळे अवघा साठ एकर वरील ऊस जळून खाक झाला. यामध्ये उसाचे क्षेत्र शेजारी शेजारी असल्याने जवळ जवळ वीस शेतकऱ्यांचेयामध्ये नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाने ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
परंतु क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे आटोक्यात आणण्यात अपयश आले. यामध्ये शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. कारण ऊस गाळपाचे सोय अगदी जवळ असल्याने उसासारख्या नगदी पिकाचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होत आहे. हा जळालेला ऊस देखील तोडणे ला आलेला होता. परंतु दुपारी अचानक आग लागल्याने सगळा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडलेली आहे. या घटनेची माहिती होताच आमदार धीरज देशमुख यांनी महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्या होत्या.
याआधी मध्ये उसाचा आहे तर इतर शेती साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानुसार आता पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी ची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्या क्षेत्रावरील ऊस जळाला हे क्षेत्र मांजरा व विकास सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत येते. घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही पण जळीत उसाची देखील तोडणी मांजरा साखर कारखाना करणार असल्याचे आ.धीरज देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल.(संदर्भ-Tv9 मराठी)
Share your comments