राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार हे सर्व देशाला परिचित असलेले नाव आहे. राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी एक स्थान निर्माण केले आहे. आता शरद पवार यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा '२, सिल्व्हर ओक' या ग्रंथाचा प्रकाशन पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे माजी राज्यपाल डि.वाय. पाटील यांच्या हस्ते पार पडला. या ग्रंथात १०० मान्यवरांचे लेख आहेत. याचा नक्कीच वाचक वर्गाला फायदा होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती शेअर करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची उणीव जानवल्याचे म्हटले आहे.
ते लवकरच पुन्हा आपल्यासोबत असतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हे पुस्तक दर्जेदार असून दत्ता पवार यांनी ते संपादित केले आहे. दुर्गा पब्लिकेशन हाऊस, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
LIC ची जबरदस्त स्कीम, 122 रुपयांची बचत करून तुम्हाला मिळणार 26 लाख, जाणून घ्या..
या प्रकाशन समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, विवेक सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार हेमंत टकले, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, मुंबईच्या माजी महापौर निर्मलाताई सामंत-प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
या प्रकाशन समारंभात उपस्थित मान्यवरांनी पवारांच्या बाबतीतील अनेक किस्से सांगितले. दरम्यान, या पुस्तकातील लेखात अनेक प्रकरची माहिती देण्यात आली आहे. यामुळे याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शरद पवार पंतप्रधान होणार? खुद्द पवार म्हणाले, पंतप्रधानपद...
आता कारखान्यावर चकरा मारणे होणार बंद! आता शेतात बसून होणार उसाची नोंदणी
'अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो, कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?'
Share your comments