पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत ज्यात खातेधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. भारतीय पोस्टाने आपल्या बचत योजनांमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्रामीण डाक सेवेच्या शाखेतून रक्कम काढण्याची मर्यादा 5 हजारापासून वाढवून 20 हजार करण्यात आली आहे.
त्यामुळे आता एका ग्राहकाला एका दिवसांत वीस हजार रुपये काढता येतील. नव्या नियमांनुसार पोस्ट ऑफिस जीडीएसच्या शाखेतून पैसे काढण्याची मर्यादाही 5000 रुपयांपासून 20,000 रुपये करण्यात आली आहे. नव्या नियमांतर्गत कोणत्याही शाखेत पोस्टमास्टर एका दिवसात एका खात्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारू शकणार नाहीत.
डाकघरातील खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक
बचत खात्याशिवाय सार्वजनिक भविष्य निधी, वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक आय योजना, किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनांमध्ये पैसे चेक किंवा विथड्रॉव्हल फॉर्मच्या माध्यमातून स्वीकारले जातील. नव्या नियमांनुसार कोणत्याही सीबीएस पोस्ट ऑफिसच्या पीओएसबी चेकला एटपार चेक मानले जाईल आणि त्यांना क्लिअरन्ससाठी पाठवले जाणार नाही. याशिवाय पोस्ट खात्यातील बचत खात्यात किमान रक्कम 500 बॅलन्स ठेवणे अनिवार्य असेल.
यापेक्षा कमी रक्कम झाल्यास दंड लागेल. पोस्ट बचत खाते ही सरकारी योजना सर्व भारतीय पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. ही योजना भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आपल्या जमा रकमेवर निश्चित व्याज देते. एकल आणि संयुक्त अशा दोन्ही खात्यांवर सध्याचा व्याजदर हा 4% आहे. यात जोखीम फार कमी असते आणि निॆश्चित लाभ मिळतात.
पोस्ट कार्यालयातील बचत खात्याचे प्रमुख लाभ
-
हे खाते अल्पवयीनांच्या नावे उघडता येते. दहा वर्षांपेक्षा जास्त वयाचे कुणीही खाते उघडू आणि हाताळू शकते.
-
नामांकनाची सुविधा खाते उघडताना आणि नंतरही उपलब्ध असते.
-
व्यक्तिगत आणि संयुक्त रुपात दोन किंवा तीन वयस्कर लोक खाते उघडू आणि हाताळू शकतात.
-
या खात्यात कमाल रकमेची कोणतीही मर्यादा न ठेवता किमान 500 रुपयांनी खाते चालू करता येते.
-
पोस्ट कार्यालयात ऑनलाईन बचत खाते उघडण्यासाठी टिप्स
-
इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बचत खाते हा पर्याय निवडा.
-
आता आता लागू करा यावर क्लिक करा आणि आवश्यक किंवा अनिवार्य असलेले तपशील भरा.
-
सबमिटवर क्लिक करा आणि आपल्या केवायसी कागदपत्रांसह सर्व विवरण तपासून घ्या.
-
यानंतर आपल्याला एक स्वागत किट मिळेल ज्यात चेकबुक, एटीएम कार्ड, आधार सीडिंग, ईबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचे तपशील इत्यादी असेल.
Share your comments