यंदा राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषदेत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. असे असले तरी शेतकरी हे ऊस गेल्यावरच समाधानी होतील कारण घोषणा झाली असली तरी ऊस जाईल की नाही याची कोणतीही शास्वती नाही. ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे.
असे असताना आता कारखान्यांच्या कारभारावर टीका केली जात आहे. हंगामात (Marathwada) मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. यामुळे अनेकांनी पहिल्यांदाच ऊस लावला आहे, त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यामुळे ज्यांना पाणी उपलब्ध होते त्यांनी अधिकचे पैसे मिळतील म्हणून ऊस लावला आणि आता लाखाचे बारा हजार होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या सर्व परिस्थितीला कारखानेच जबाबदार आहेत असे नाही तर गेल्या दोन वर्षात ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढही महत्वाची आहे. मराठवाड्यातील तब्बल 36 साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. असे असतानाही ऊस शेतातच असून आता उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
क्षेत्र वाढीचा तसेच अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसतोडणीमध्ये खंडही निर्माण झाला होता. गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचे गाळप हे सुरु असून मे अखेरपर्यंत सुरुच राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र हा नेहेमी आघाडीवर असताना आता मात्र मराठवाडा विभागात ऊसाचे गाळपही वाढले आहे. यामुळे अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक कारखाने हे दैनंदिन गाळप क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करीत आहेत. असे असले तरी प्रश्न आहे असाच आहे. तसेच लागवडीदरम्यान आवश्यक असलेली नोंदणी शेतकऱ्यांनीही केली नसल्याचे समोर येत आहे. यामुळे केवळ कारखान्यांना दोष देणे चुकीचे ठरणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे पुढील काळात अशा अडचणी येणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या;
कांदा बाजारभावाला लागली नजर, दरामध्ये झाली मोठी घट, शेतकरी अडचणीत
दुधाच्या दरात वाढ मात्र अडचणी त्याच, वाचा तज्ञांनी सांगितलेला संपूर्ण हिशोब...
Share your comments