सिमेन्स, डिएमआरसी, महिंद्रा आरएचएफएल, इंडियन ऑईल आणि युअर स्पेस ठरले बीएमएल मुंजाल पुरस्काराचे मानकरी

03 February 2021 08:20 PM By: भरत भास्कर जाधव
BML Munjal Award

BML Munjal Award

 नाविन्यपुर्ण प्रशिक्षण आणि त्याआधारे विकासातून आपल्या उद्योग व्यवसायात सर्वोत्तम कामगिरीसाठी हिरो उद्योग समुहातर्फे कंपन्यांना दरवर्षी दिला जाणारा बीएमएल मुंजाल पुरस्कार २०२० साठी  सिमेन्स इंडिया, महिंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, युवर स्पेस आणि इंडियन ऑईल कॉरर्पोरेशन यांना जाहीर करण्यात आला. 

हिरो उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या नावाने दिला जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा आणि ऑनलाईन पध्दतीने त्याचे वितरण २९ जानेवारीला प्रख्यात शास्त्रज्ञ, संशोधक आणि पद्मविभुषण पुरस्काराचे मानकरी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. तेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मानकऱ्यांच्या नावाचे वाचन पुरस्कार निवड समिती सदस्यांनी केले. 

खासगी उद्योगक्षेत्रात उत्पादन आणि सेवा गटात सिमेन्स इंडिया आणि महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स हे पुरस्काराचे मानकरी ठरले, तर सार्वजनिक कंपनी सेवा गटात डीएमआरसी विजेते ठरले. उगवते तारे गटात युअर स्पेस या कंपनीने प्रथम क्रमांक पटकविला. सातत्यपुर्ण कामगिरीसाठीच्या गटात आयओसीला पुरस्कार देण्यात आला.  

 

आत्तापर्यंतच्या १५ वर्षात या वार्षिक पुरस्काराच्या निमित्ताने  ५० कंपन्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आलेले आहे. या पुरस्काराची सुरुवात  २००६ पासून झाली. त्यावेळी दोनच गट होते आणि ३५  कंपन्या सहभागी झाल्या होत्या.  २०२०  च्या पुरस्कारात पाच विजेत्यांची निवड करण्यात आली आणि त्यासाठी १७५  कंपन्यांनी आपले अर्ज सादर केले होते.

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले," कोवीडच्या पेचप्रसंगात सर्वसामान्य नागरिक आणि या प्रसंगातून बाहेर पडण्याची क्षमता यावरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झालेले आहे. 

सर्वोत्कृष्ठतेचा ध्यास, कार्यशैलीत लवचिकता आणणे आणि नागरिकांमध्ये जाणीवांचे बीज पुन्हा फुलविणे ही शिकवण या महामारीने आपल्या सर्वांना  दिली. संस्थांनी त्यांच्या पातळीवर फांद्या आणि मुळांच्या रुपाने ज्ञानाचा प्रसार आणि शिकवण देणारा एक वटवृक्ष म्हणूनच स्वतः कडे पाहिले पाहिजे. "

Siemens Mahindra RHFL BML Munjal Award winners महिंद्रा आरएचएफएल सिमेन्स डिएमआरसी बीएमएल मुंजाल पुरस्कार
English Summary: Siemens, DMRC, Mahindra RHFL, Indian Oil and YourSpace become BML Munjal Award winners

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.