अनेक युवकांना व्यवसाय सुरू करायाची इच्छा असते पण पुरेसा पैसा आणि व्यावसायाची माहिती नसल्याने युवकांचे स्वप्न अपूर्ण राहत असते. तर काहींकडे पैसा असतो पण व्यावसायाची कल्पना नसते. व्यवसाय सुरू करण्यासाठी सकारच्या अनेक योजना असतात. पण त्या आपल्या पर्यंत पोहचत नसल्याने नव उद्योजकांना याची माहिती होत नाही. परंतु आता युवकांना शासकीय योजनांची माहिती आणि बँकेच्या सुविधा काय असतात याची कल्पना होणार आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेने एक व्यासपीठ तयार केले आहे, ज्यातून युवकांना शासकीय योजनांची माहिती आणि बँकेच्या सुविधा याची माहिती मिळेल.
सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (sidbi ) ने ट्रांस यूनियन सिबिलच्या सोबत एमएसएमई सक्षम पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हे पोर्टल असणार आहे, यामुळे उद्योजकांना पोर्टलवर देण्यात आली आहे, ही माहिती त्यांना योग्य प्रकारे समजेल. या पोर्टलमध्ये छोट्या व्यावसायिकांना शासकिय योजनांची माहिती मिळेल. यासह पोर्टल उद्योजकांना बँकेत त्यांची क्रेडिट रेटिंग ठरण्यास मदत करेल. सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा म्हणतात की, या पोर्टलचा उद्देश युवकांना व्यावसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत एमएसएमईसाठी सुरू करण्यात आलेली आपातकाळीन क्रेडिट लाईन गारंटी स्कीम ही सर्वात चांगली सुविधा आहे. यात छोटे व्यावसायिकांना बँक कर्जाची सुविधा पुरवली जाते. सीआयडीबीआय (sidbi )
च्या पोर्टल एमएसएमईएस च्या मदतीसाठी सुरु करण्यात आली आहे. यात केंद्र आणि राज्य सरकाच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. यासह व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत देखील यातून केली जाते. यासाठी इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे छोटे व्यापारी सोप्या पद्धतीने दिलेली माहिती समजू शकतील.
Share your comments