गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उस दरावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली आहेत. आता ते राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे सगळे नियम रद्द केले, मग एकरकमी एफआरपी कायद्यात दुरुस्ती करण्याची संधी होती ती का करत नाही? कोल्हापुरात लढून एफआरपी घेतली. इतर ठिकाणी शेतकऱ्यांना संघर्ष करून घ्यावी लागते. हे दुर्दैवी आहे.
इतर कारखान्यांना ते का जमत नाही? वाघ आहे की शेळ्या हे दाखवू देऊ. गेल्यावर्षीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही. काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले होते. आता ते चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांना 29 नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी, ऑनलाईन वजनकाटे तसेच गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचे दोनशे रुपये मिळावेत, वाहनधारक व मजूर महामंडळांमार्फत पुरवण्यात यावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उस परिषद घेतली आहे.
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
सरकारने दोनवेळा फसवणूक केली असून जर 29 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 3 डिसेंबरला मोठ्या ताकदीने चक्का जाम करू असेही ते म्हणाले. राज्यातील एकही महामार्ग, राज्यमार्ग सुरु राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आता आरपारची लढाई असेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या;
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, व्हायरसच्या हल्ल्यात बागा उद्ध्वस्त
नाशिक येथील १५ व्या कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार
Share your comments