सध्या साखर कारखानदारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एकदा मोर्चा काढला पाहिजे. त्यांना काय संशोधन केलं ते विचारलं पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.
तसेच राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पोरगा कारखाना चालवणार आणि बाप त्याचे पर्यवेक्षण करणार मग पर्यवेक्षण कसं नीट होईल. हे म्हणजे मुलगा पेपर लिहिणार आणि बाप पेपर तपासणार असे झाले.
यावर्षी शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील कारखान्यांकडे अतिरीक्त ज्यादाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉलचं उत्पादन केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत.
काय सांगता! आता पिकाचे भविष्य आधीच कळणार, पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप
राजू शेट्टी म्हणाले, दौंड शुगर कारखान्याकडे अतिरीक्त 43 कोटी रुपये, भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याकडे 51 कोटी, कर्मवीर कारखाना इंदापूर 40 कोटी, बारामती अॅग्रो 116 कोटी, नीरा भिमा कारखान्याकडे 30 कोटी असल्याचे ते म्हणाले. ही आकडेवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऑडीटनुसार आहे.
याचा हिशोब घेणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्याचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने जाहीर केली मदत! अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
तसेच हे जर मोडून काढायचं असेल तर पुन्हा नव्यानं संघर्षाला सुरुवात करावा लागेल. आपण जर आता संघर्ष नाही केला तर काळ आपल्याला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच ऊस दरावरून देखील येणाऱ्या काळात संघर्ष होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ, मिळतोय आतापर्यंतचा सर्वाधिक दर
'शेती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकार कृषी स्टार्टअप्सना मदत करत आहे'
छत्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकला! जाचक-घोलप-काकडे एकाच व्यासपीठावर
Share your comments