1. बातम्या

महाराष्ट्रात आता युरियाची टंचाई! शेतकरी झालेत हतबल

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पावसाने पार झोडपून काढले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. आपले हाताशी आलेले सोन्यासारखे पिक पार मातीमोल झाले होते, ह्या सर्व्यातून शेतकरी राजा कसाबसा सावरण्याचा प्रयत्नच करत होता तर आता लगेच युरियाचे संकट (Urea Crisis) उभे राहिले आहे. युरिया खाद्याचे पिकाच्या वाढीसाठी खुप महत्व असते जर पिकाला युरिया वेळेवर लावला गेला नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट घडून येईल आणि शेतकरी अजून एकदा हाती येऊ पाहणारे पिक डोळ्यादेखत राख होत बघत बसेल. ह्या सर्व परिस्थितीला मग कोण जबाबदार असेल? असा खोचक सवाल आता शेतकरी बांधव विचारत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
urea

urea

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पावसाने पार झोडपून काढले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. आपले हाताशी आलेले सोन्यासारखे पिक पार मातीमोल झाले होते, ह्या सर्व्यातून शेतकरी राजा कसाबसा सावरण्याचा प्रयत्नच करत होता तर आता लगेच युरियाचे संकट (Urea Crisis) उभे राहिले आहे. युरिया खाद्याचे पिकाच्या वाढीसाठी खुप महत्व असते जर पिकाला युरिया वेळेवर लावला गेला नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट घडून येईल आणि शेतकरी अजून एकदा हाती येऊ पाहणारे पिक डोळ्यादेखत राख होत बघत बसेल. ह्या सर्व परिस्थितीला मग कोण जबाबदार असेल? असा खोचक सवाल आता शेतकरी बांधव विचारत आहेत.

आपल्या महाराष्ट्रातील, विदर्भातील वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यापासुन युरिया खाद्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे त्यामुळे जिल्यातील कापुस उत्पादक शेतकरी (Cotton Grower Farmers) सर्व्यात जास्त चिंतेत आहेत. कापुस/कपाशी पिकाच्या वाढीसाठी युरिया खुप महत्वाचा घटक असतो, त्यामुळे शेतकरी खुप हताश झाला आहे.  शेतकरी गेल्या दोन आठवड्यापासून रोजच युरिया खाद्यासाठी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट देतो पण दिवसाच्या शेवटी निराश आणि हतबल होऊन घरी परततो.

ह्या ऐन कापुस पिकाच्या (Cotton Crop) वाढीच्या वेळी युरियाची आवश्यकता अधिक असते, ह्यामुळे शेतकरी (Farmer) आपल्या जिल्ह्यात युरिया मिळत नाही म्हणुन नाईलाजाने शेजारच्या जिल्ह्यातून युरियाच्या गोणी आणायला जात आहेत. विदर्भ विभागातील नागपूर ह्या उपविभागातील महत्वाच्या जिल्ह्यापैकी एक आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यात कपाशी पिकाखालील लागवडीचे क्षेत्र खुप जास्त प्रमाणात आहे, आधीच अतिवृष्टीने (Heavy rain) हैराण झालेला वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आता युरियाच्या टंचाईने हतबल होत आहे. पावसामुळे कपाशी पिक आधीच कमकुवत बनले आहे आणि त्यात पिकाला वेळेवर युरिया मिळाला नाही तर, कपाशी पिकाच्या उत्पादनावर (Cotton Production) खुप विपरीत परिणाम होईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

युरियाची गोणी महागात विकत घेत आहेत शेतकरी

कापसाचे चांगले उत्पादन यावे आणि कपाशीच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी शेतकरी कापुस पिकाला युरिया लावतात.  परंतु वर्धा जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत युरियाची उपलब्धता फारच कमी नाही. युरिया खाद्याची 45 किलोची गोण 266 रुपये किमतीला सर्वसाधारण वेळी मिळते मात्र युरियाच्या टंचाईमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया साठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर युरिया खाद्य उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात युरियाच्या खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे युरिया आणण्यासाठी त्यांना वाहतुकीचा खर्च पण जास्त होतोय त्यामुळे युरिया हा शेतकऱ्यांना सामान्य वेळेपेक्षा अधिक पटीने महाग पडतोय.

काय म्हणतोय बळीराजा...

 

मुसळधार पावसामुळे कपाशी पिकांचे आधीच खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वर्धाचे शेतकरी सांगतात. पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच लाखोंचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका कपाशी पिकाला पण बसला पण त्यातून थोड्या-मोठ्या प्रमाणात कापुस पिक बचावले आहे पण त्यासाठी पिकाला युरिया खाद्य मिळणे आवश्यक आहे नाही तर कपाशीचे पिक वाढणार नाही आणि उत्पादनात घट होईल. युरिया खत मिळवण्यासाठी आम्हाला इतर जिल्ह्यात जावे लागते, ज्यामध्ये आमचा जास्त खर्च होतो. त्यामुळे शासनाने जातीने लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी ह्यावेळी केली.

English Summary: shortage of urea farmer very anxious for the urea Published on: 10 October 2021, 07:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters