यावर्षी देशांमध्ये 99 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे.
राज्यात कुठेही बोगस खते, वजनात कमी किंवा बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास संबंधित दुकानदारासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांची पीककर्जासाठी कुठल्याही प्रकारची अडवणूक करू नये जे उद्दिष्ट दिले असेल ते पूर्ण करून शेतकऱ्यांना हंगामा पूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा आशयाच्या सूचना देखील त्यांनी बँकांना केल्या.
नाशिक विभागीय खरीप हंगामाची नियोजन बैठक
नाशिक विभागीय खरीप हंगामाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून विभागाची एकूण 25 लाख 67 हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते निविष्ठांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.
यावेळी भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की खरीप हंगामासाठी गावपातळीवर ग्रामविकास समित्या स्थापन केले आहे. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार असून बियाने, खते व निविष्ठा यांचे नियोजन गाव, तालुका व जिल्हा पातळीवर करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील पेरणीयोग्य पाऊस होत नाही तोपर्यंतपेरणी करू नये. जिल्हाधिकार्यांनी दर आठवड्याला पीक कर्ज देणाऱ्या बँके समवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांना समजावून शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना बियाण्यांचे कीट मोफत देण्यात येणार असून जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून महाबिज च्या माध्यमातून बियाण्यांचे किट मोफत देण्याचे आदेश दिले.
शेततळ्यांसाठी आता 50 ऐवजी 75 हजार अनुदान
शेततळ्यांचे अनुदान 50 हजारावरुन 75000 करण्यात आले असल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना दादा भुसे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गावात कृषी भवन, कृषी कार्यालय उभारण्यासाठी शासनाच्या मालकीच्या असलेल्या जागेत प्रयत्न करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खरीप हंगाम : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…
नक्की वाचा:महागाईचा उडाला भडका; गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ
नक्की वाचा:राहिबाई पोपेरे यांनी सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहचवला : शरद पवार
Share your comments