सध्या रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम जगभर जाणवत आहेत, त्याला भारतही अपवाद नाही. जागतिक बाजारपेठेत अन्न पुरवठा घटल्याने साखळी विस्कळीत झाली आहे, अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. अन्न, इंधन आणि स्वयंपाकाचे तेल महाग झाले आहे. याचा परिणाम महागाईवर झाला आहे. भारतातील किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मार्चमध्ये १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. फेब्रुवारीमध्ये सुधारित दर १३.४३ टक्के ते १३.११ टक्के होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १०.७४ टक्के होता.
दरम्यान, एप्रिल पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात राहिला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. खनिज तेल, धातू, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या वाढत्या किमती ही महागाई वाढण्याचे मुख्य कारण असल्याचे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल?
आपल्या जीवनात सर्वात महत्वाचे असते ते अन्न पण आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती ८.३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यपदार्थावर होत आहे, यामध्ये पालेभाज्या, खाण्याचे तेल, तसेच दुध व इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.
फळांच्या किमती गेल्या महिन्यात १०.६२ टक्क्यांच्या तुलनेत १०.८९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गव्हाचे दरही १४.०४ टक्क्यांवरून १०.७० टक्क्यांवर आले आहेत. मार्चमध्ये ९.४२ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये अंडी, मांस आणि मासे यांच्या किमती ४.५० टक्क्यांनी घसरल्या आहेत.
मार्चमधील ३४.५२ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये इंधन आणि ऊर्जा महागाई ३८.६६ टक्क्यांवर पोहोचली. पेट्रोलचा महागाई दर ६०.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे तर HSD (हाय स्पीड डिझेल) मध्ये ६६.१४ टक्के आणि एलपीजीचा दर ३८.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होणार आहे. व आपल्याला महागाईचा सामना करावा लागणार आहे. यावर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. महागाई कमी व्हावी यासाठी RBI ने ही रेपो रेट वाढवला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले
Share your comments