गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणू सोबत लढत आहे. यामध्ये अनेकांचे जीव देखील गेले. असे असताना काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोरोनाच्या आतापर्यंत तीन लाटा आल्या आहे. ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. तर अनेक कुटूंब उध्वस्त झाली आहे. आता पूर्वीसारखे होत असल्याचे दिसून येत असताना जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
कोरोना विषाणूचे डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकार एकत्रितपणे आले असल्यामुळे एक नवीन विषाणू बनला आहे, याचे पुरावे देखील सापडले आहेत. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की डेल्टा आणि ओमिक्रॉन वेगाने पसरत असल्यामुळे ही भीती आधीच व्यक्त केली जात होती. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारी २०२२ मध्ये फ्रान्समध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे.
तसेच अनेकदा अनेक शास्त्रज्ञांनी म्हटले होते की, कोरोनाचे अनेक प्रकार समोर येऊ शकतात. याचाच हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टाचा रीकॉम्बिनंट व्हायरस पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी ट्विट केले आहे की, SARSCov2 चे ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे. आम्ही याची माहिती घेत आहोत आणि त्यावर चर्चाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच डेल्टा-ओमिक्रॉनच्या मिश्रित विषाणूचे ठोस पुरावे मिळाले आहेत. फ्रान्समध्ये जानेवारी २०२२ पासून त्याचा प्रसार होत आहे. त्याच प्रोफाइलचे व्हायरस डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही सापडले आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने पत्रकार परिषदेत सांगितले की, हा विषाणू प्राणघातक असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. असे असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण भेटत होती, तर हजारोंच्या संख्येने लोकांचे मृत्यु होत होते. ही परिस्थिती खुप भयंकर होती. पण आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे सगळे जीवन आधीसारखे होत आहे. असे असतानाच आता पुन्हा कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी कोरोनामध्ये आपली जवळची लोक गमावली आहे. यामुळे याचा सगळ्यांनाच फटका बसला आहे.
Share your comments