गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान घातले आहे. अजूनही हे संकट कायम असून अनेकांचे यामुळे निधन होत आहे. असे असताना आणखी एक नवे संकट समोर उभे राहताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागत आहे. पण आता एक अशी आपत्ती येणार आहे, ज्या आपत्तीचा माणसाच्या शरीरावर काही प्रभाव नाही होणार, पण त्याच्या जीवणावर नक्की याचा परीणाम होऊ शकतो. यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किलर हॅमरहेड फ्लॅटवर्म्सच्या दोन नवीन प्रजाती आढळल्या असून ज्या भविष्यात खूप प्राणघातक ठरणार आहे.
सध्या त्यांचा आवाका फक्त बागांपर्यंतच आढळून आला आहे. पण यावर उपाय लवकर सापडला नाही तर त्याची वाढ लवकरच स्वयंपाकघरात होऊ शकतो. ज्यामुळे माणसाच्या जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे आता यावर कधी उपाय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आढळून आल्यानंतर काही दिवसांतच ते अनेक देशांमध्ये दिसले आहेत. यामुळे जगभरात याचा विस्तार होण्यास उशीर लागणार नाही. फ्लॅटवर्म असे या नवीन आपत्तीचे नाव आहे.
त्याच्या सर्वात मोठ्या प्रजातीची लांबी ३ फुटांपर्यंत असू शकते. ब्रिटीशांच्या बागांमध्ये आता फ्लॅटवर्म दिसू लागले आहेत. यामुळे उद्यानांच्या जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. वनस्पतींच्या आयात आणि निर्यातीमुळे, या फ्लॅटवर्मच्या १० पेक्षा जास्त प्रजाती आशियापासून जगभर पसरू लागल्या आहेत. फ्रान्स, इटली आणि आफ्रिकेतील एका बेटावर फ्लॅटवर्मची नवीन प्रजाती सापडली आहे. आता यावर तातडीने उपाय करणे गरजेचे आहे, नाहीतर येणाऱ्या हे धोकायदाक ठरू शकते. गांडुळे आणि गोगलगाय हे या फ्लॅटवर्मचे मुख्य खाद्य आहे.
त्यांच्याकडे संपूर्ण उभे पीक नष्ट करण्याची क्षमता आहे जशी उष्णता वाढेल तसतसा या कीटकांचा प्रादुर्भावही वाढेल आणि एकावेळी हजारोंच्या संख्येने संपूर्ण जमिनीत पसरू लागेल. या प्रजाती अत्यंत धोकादायक आणि आक्रमक आहेत. त्यांची क्षमता इतकी आहे की, लवकरच ते जगभर पसरतील आणि जगभर आपले साम्राज्य प्रस्थापित करतील. या नवीन संकटामुळे शास्त्रज्ञांची चिंता आणखी वाढली आहे. यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Share your comments