सध्या अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी यामुळे वेगवेगळ्या धक्कादायक घटना घडत आहेत. आता शिरूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कासारी हद्दीत बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन आलेल्या बैलाने युवकाच्या पोटात शिंग खुपसले आहे.
शिंग खुपल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वृषाल राऊत असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत योगेश अरुण राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश राऊत, दिनेश राऊत आणि ऋषाल राऊत सकाळी नऊ वाजता कासारी गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा घेऊन गेले होते.
त्यावेळी बैलगाडा गाडीतून उतरवत असताना बैलाने वृषालच्या पोटात शिंग खुपसले. त्यावेळी जखमी झालेल्या वृषाल याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र त्याचे निधन झाले.
राज्यात आज 'या' ठिकाणी गारपिटीचा होणार, हवामान खात्याचा इशारा..
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. सध्या अनेक ठिकाणी बैलगाडा जत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यात विकास सोसायट्यांचे जाळे वाढणार, २ लाख संस्था स्थापन करणार, केंद्राचा निर्णय..
दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बैलगाडा शर्यत आयोजित करताना अनेक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे अनेकजण जखमी देखील होत आहेत.
भारतीय शेतीमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे फायदे
पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत, शेतकरी संघटना आक्रमक..
भारतीय शेतीतील सिंचन व्यवस्थापन
Share your comments