1. बातम्या

धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण सुरू असलेले अख्या महाराष्ट्राने पाहिलंय. अजूनही राजकारण सुरूच आहे. अशा परिस्थितीत राजकारण्यांचे मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
farmers

farmers

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण (politics) सुरू असलेले अख्या महाराष्ट्राने पाहिलंय. अजूनही राजकारण सुरूच आहे. अशा परिस्थितीत राजकारण्यांचे मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

एकीकडे राजकारण थांबता थांबत नाही तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे. मराठवाड्यातुन शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे.

मागच्या 9 महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्येच टोकाचा पाऊल उचलले आहे. शिवाय यातील 400 शेतकऱ्यांनी (farmers) पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे.

शेतकऱ्यांनो मोहरीच्या 'या' सुधारित वाणाची करा शेती; मिळेल दुप्पट फायदा

मराठवाड्यला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण

सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) आत्महत्या थांबत नाही. महत्वाचे म्हणजे आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असली तरीही अनेक ठिकाणी मदत अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे.

16 ऑक्टोबरनंतर वृषभ, सिंह राशीसह या लोकांची चिंता वाढणार; जाणून घ्या राशीभविष्य

आत्महत्या आकडेवारी (1 जानेवारी 2022 ते 30 सप्टेंबर 2022 )

पिकांचे नुकसान आणि कर्जाच्या बोज्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या 9 महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे.

यामधील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत, 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 
मासिक पाळी उशिरा का येते? जाणून घ्या नेमकं कारण...
मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; प्रतिक्विंटलला मिळतोय तब्बल १८ हजार ५०० रुपये दर
दिलासादायक! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा, मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या

English Summary: Shocking 756 farmers committed suicide in the last 9 months Published on: 11 October 2022, 01:06 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters