भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता बारामती ॲग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे.
याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शिंदेंनी दिले होते. यावेळी त्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती.
साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
याबाबत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते.
सरकारने ठरवून दिलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर कारखाना सुरू केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी चौकशी करून रोहित पवार(Rohit Pawar) यांना क्लिनचीट दिली. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे नाव अजय देशमुख असून त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर सहकार विभागाकडे राम शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती.
Share your comments