
Sanjay Raut
शिवसेना (Shivsena) खासदार आज संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलीस राऊतांना न्यायालयाकडे घेऊन जात होते. त्यावेळी जाता जाता माध्यमांनी त्यांना चिन्ह गोठवण्यात आल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनीदेखील आता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या.
काँग्रेसचे तीन वेळा चिन्ह गोठवले होते. जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते. नावात काय,शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे," असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या बद्दलच्या रंजक गोष्टी; जाणून घ्या
"अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
दुर्दैवी! मातेचा तीन मुलींसह तलावात बुडून मृत्यू; आत्महत्या की घातपात? उलट सुलट चर्चा
Share your comments