BJP vs Shiv Sena: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेसचे नेते खासदार संजय राऊत यांना आज अटक झाली आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (National President J.P.Nadda) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रातून शिवसेनाही (Shiv Sena:) संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नड्डा यांनी म्हटले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही.
हे ही वाचा: संजय राऊतांच्या अटकेनंतर घरात सापडली तब्बल 'इतकी' रक्कम, कागदपत्रेही नाहीत..
भाजपविरोधात लढण्यासाठी आता कोणताही राष्ट्रीय पक्ष (National Party) शिल्लक राहिलाच नाही. काँग्रेस 40 वर्षानंतरही भाजपला आव्हान देऊ शकत नाही असेही नड्डा यांनी म्हटले. पक्षाची विचारधारा मजबूत असून लोक ज्या पक्षात 20 वर्ष राहिलीत, तो पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले.
देशात भाजपला लोक स्वीकारत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. आता देशातील 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. भाजपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचा दावा करून ते म्हणाले की, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते असेही ते म्हणाले.
हे ही वाचा: सगळ्यांचे सरकार बघितले, आता उद्याच विधानसभा निवडणुक झाली तर काय होणार, बघा धक्कादायक कल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
हे ही वाचा: Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 5 मोठे बदल
Share your comments