
Shinde government
मुंबई: देशासह महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. शिंदे-फडणवीस सरकार करणार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे.
तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज मिळणार आहे.
1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार दिले जाणार आहे.
मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर
शिधापत्रिकाधारक यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार?
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना मिळणार आहे.
म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याच्या वाटपाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बारामतीत पवारांना रोखण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आखली रणनीती
Share your comments