गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली जात होती. तसेच महाविकास सरकारने ज्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेल्या ज्यामध्ये ५० हजार मदतीची देखील घोषणा केली होती, यावर आता शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणारी तात्काळ मदतीच्या रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा आज विधानसभेत केली.
यामध्ये आता पूरग्रस्तांच्या मदतीत ५ हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली जात घोषणा शिंदे यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासह नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.
यामध्ये किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. तसेच आधुनिक शेतीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅनो युरीया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल कल्टिव्हेशन ह्या टेक्नॉलॉजीच्या वापरास शासनाद्वारे पाठींबा दिला जाणार आहे. तसेच राज्यात ज्याठिकाणी वारंवार पूर येतो आणि आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, आणि विद्यार्थी लटकून नदी पार करत आहेत
अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल. तसेच गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत देखील अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.
Milk FRP; दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी किसान सभा होणार आक्रमक, घेतला मोठा निर्णय
अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. तसेच पिक विविधीकरणा (Crop Diversification) अंतर्गत तेलबिया, डाळवर्गीय पिके व फलोत्पादन यावर विशेष भर देण्यात येऊन मूल्य साखळी विकसित करण्यात येईल. उच्च मूल्य दर्जाची पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संपूर्ण इको सिस्टिम तयार केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..
'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'
शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी समोर, वाचा कोणाची लागणार वर्णी?
Share your comments