Amravati News : राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढता आहे. अमरावती जिल्ह्यात मागील ११ महिन्यात २९७ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून, बँक कर्ज, नैसर्गिक संकट अशा विविध कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. अमरावतीत सर्वात जास्त आत्महत्या एप्रिल महिन्यात झाल्या आहेत.
शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी टोकाचे पाऊलं उचलत आहेत. दिवसेंदिवस जमीन नापिक होत आहे, शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे, मुलांच्या शिक्षणांच्या समस्या आहेत यामुळे शेतकरी टोकाचे पाऊलं उचलत आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत अमरावती विभागात तब्बल ९५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या अमरावती विभागात ९५१ झाल्या आहेत. तर मराठवाडा विभागात ८७७, नाशिक विभागात २५४, नागपूर विभागात २५७, पुणे विभागात २७, लातूर जिल्हा ६४ आणि धुळे जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
राज्यात सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. तर सर्वांत कमी आत्महत्या ह्या पुणे विभागात झाल्या आहेत. परंतु दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याच्या आलेख वाढत आहे. तसंच नापिकी, बँक कर्ज, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी संकटात सापडत चालेला आहे.
नैसर्गिक आपत्ती वाढत चालली आहे, शेतीच्या सुविधा कमीआहेत, बँकांकडून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जातं आहे, डीबीटी पोर्टलवर सुविधा कमी देण्यात आल्या आहेत, काही भाग कोरडा (ड्राय) असल्याने सिंचनासाठी सुविधा दिली जात नाही किंवा अनुदान दिले जात नाही, सरकारी योजनाचे अनुदान कमी दिले जात आहे, यामुळे जिल्हयातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होतं आहे. त्यामुळे शेवटचा पर्यांय म्हणून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय शेतकरी घेतं आहेत. यामुळे सरकारने शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
अशोक ठाकरे, शेतकरी - अमरावती
Share your comments