नाशिक
नाशिक बाजार समितीत सध्या पालेभाज्या कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे भालेपाज्या उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीर, मेंथी, शेपू भाज्या शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात फेकून दिल्यात.
पालेभाज्यांना आता कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता भाजीपाला फेकून दिला आहे. तसंच काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली भाजी दराअभावी बाजारात तशीच सोडून दिली आहे. सध्या बाजारात कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यंदा पावसानं चांगलीच ओढ दिलेली आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात तयार कोथिंबीर होती तिची आवक वाढलेली आहे. गेल्या महिन्यामध्येच याच कोथिंबीरीला १५० ते २०० रुपये दर मिळत होता. मात्र आता हे दर अक्षरशा दोन-तीन रुपयांवर आले आहेत.
बाजारात कोथिंबीरीला कवडीमोड भाव मिळत असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आता खचलेले आहेत. खचलेल्या शेतकऱ्यांनी आपला तयार झालेला कोथिंबीरचा माल आता बाजार समिती परिसरात फेकून द्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आता नाशिकच्या शेतकऱ्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी माल थेट रस्त्यावर फेकून देत आहे. दर नसल्याने शेतकरी चांगलाच रोष व्यक्त करत आहेत.
सोलापुरातही शेतकऱ्यांनी कोथिंबीर दिली फेकून
सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिल्याची घटना घडली आहे. बीडमधील शेतकऱ्यांनी सोलापूर बाजारात विक्रीसाठी कोथिंबिर आणली होती पण भाव न मिळाल्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली आहे.
Share your comments