Jalgaon News :
राज्य सरकारने सुरु केलेला 'शासन आपल्या दारी'कार्यक्रम आज (दि.१२) रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात पार पडला. यावेळी काही शेतकऱ्यांनी बैलजोड घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. बैलांच्या पाठिवर बोर्ड लावून आणि शेतकऱ्यांनी गळ्यात बोर्ड लावून हे आंदोलन केलं आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता. त्याठिकाणी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र शेतकरी बैलजोड घेऊन येत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना अडवले.
यावेळी या बैलांच्या पाठिवर विविध मागण्या करणारे बोर्ड लावण्यात आले होते. यातील एका बोर्डावर लिहिले होते की, मुख्यमंत्री साहेब माझ्या साहेबाला न्याय मिळेल का? मुख्यमंत्री साहेब कृषी विभाग ऑफिस मधून काम करत आहे शेतकऱ्याच्या शेतात जातात का? असा देखील बोर्ड लावण्यात आला होता.
राज्य शासनाने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केलेला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे. आज हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पार पडला. याआधी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम जळगावमध्ये होणार होता पण काही अडचणी आल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र आज मंगळवारी हा कार्यक्रम जळगावमध्ये पार पडला. यावेळी गरजुंना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात आला.
दरम्यान, सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावा यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी येत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
Share your comments