मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रियांना वेग आला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. पण आता चिन्ह असो किंवा नसो पण आता निवडणुकांना पुढे जाण्याची तयारी दाखवली पाहिजे, कारण मिही वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढलो.
शिवसेना तर अजिबात संपणार नाही, ती अजून जोमाने उभी राहणार आहे" असं मत राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यावर व्यक्त केलं आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
दुर्दैवी! विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू
पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतदेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.
मोठी बातमी: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवलं
Share your comments