माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने सध्या एक कोटी टनांपेक्षा जास्त साखर निर्यात करू नये असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने भारतातून फक्त एक कोटी टन साखर निर्यात केली जावी अशी सूचना जारी केली आहे. त्यात आणखी 10 टन वाढ करण्याची गरज आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये अनेक सण येतात. त्यावेळी साखरेचे मागणी वाढते. अशा परिस्थितीमध्ये साखर कमी पडू नयेत याकरिता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षात मर्यादित प्रमाणात साखर निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी होती. साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाल्याने याची मोठ्या प्रमाणात निर्यात होणार व त्यामुळे स्वदेशात त्याचे दर वाढतील म्हणून साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली.
या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्या साखर एके साखर निर्माण करून चालणार नाही. आता कारखान्यांना इथेनॉल सारखे पर्याय निवडावे लागणार आहेत. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारांमध्ये साठेबाजी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात स्थिरता नाही.
Post Office Scheme; बातमी कामाची! पोस्ट ऑफिसची नवीन योजना, १० हजार भरा आणि १६ लाख मिळवा
अशा परिस्थितीमध्ये भारतातील साखर खरेदी करून तिचा वापर अधिक फायद्यासाठी जागतिक व्यापारी करण्याची शक्यता आहे. या कारणामुळे भारत सरकारने साखरेबरोबरच इतर काही कृषी उत्पादनाच्या निर्यातीवर मर्यादा आणल्या असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर या निर्णयामुळे भारतामध्ये साखरेचे दर वाढणार नाहीत असे केंद्र सरकारला वाटते. यामुळे यामध्ये पुढील काही काळात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक
Share your comments