मुंबई: शिवसेनेत (Shivsena) गेल्या काही दिवसांपूर्वी २ गट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील काही आमदारांना सोबत घेत भाजपबरोबर (BJP) सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कशा ना कशावरून तरी वादाची ठिणगी पडत आहे. आता निमित्त आहे ते शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra Rally) कोणी घेईचा?
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये टीका सत्र सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले आहे तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहेत. अजूनतरी कोणालाही परवानगी मिळाल्याची दिसत नाही.
आता शिंदे आणि ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पवार शिवसेनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे दिसत आहेत.
LIC Scheme: छोट्या गुंतवणुकीत 22 लाखांपर्यंत परतावा, LIC ची नवी योजना; जाणून घ्या सविस्तर...
शरद पवार म्हणाले, मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला आहे.
बिहारच्या सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार हे दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे देशाच्या सध्याच्या राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी दुसरा पर्याय शोधण्यावर भर देण्याची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
गॅसच्या किमती 5 वर्षात किती वाढल्या? आकडा ऐकून तुम्ही व्हाल हैराण...
आमच्या कमळाला बाई म्हणता, तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विनसेना म्हणायचं का?
Share your comments