1. बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांची आंबेगावात नाहीतर 'या' मतदारसंघात सभा होणार

शरद पवारांचे जवळचे निकटवर्तीय समजले जाणारे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांच्या मतदारसंघात पहिली सभा घेण्याची चर्चा रंगली हाती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आंबेगाव सोडून इतरत्र पवारांच्या सभा होत आहेत.

Sharad Pawar Sabha Update

Sharad Pawar Sabha Update

Pune Sharad Pawar Sabha :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यांनी राज्यात स्वाभिमानी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. अजित पवार गटासोबत केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभा पार पडत आहेत. मात्र आता पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यात शरद पवारांची सभा होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आंबेगावात शरद पवारांची सभा होणार नसून जुन्नर तालुक्यात १ ऑक्टोबर शरद पवारांची सभा होणार आहे.

शरद पवारांचे जवळचे निकटवर्तीय समजले जाणारे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांच्या मतदारसंघात पहिली सभा घेण्याची चर्चा रंगली हाती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आंबेगाव सोडून इतरत्र पवारांच्या सभा होत आहेत. आताही आंबेगावऐवजी जुन्नर तालुक्यात १ ऑक्टोबरला शरद पवारांची सभा पार पडणार आहे.

पवारांची जुन्नरमध्ये सभा होत असल्यामुळे शरद पवार आमदार अतुल बेनके यांच्याबाबत काय बोलणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात शरद पवार आंबेगाव तालुक्यातच नाहीतर शिरुर विधानसभा मतदारसंघातही त्यांचा सभा होणार आहे.

अजित पवार गटासोबत शरद पवारांचे अनेक विश्वासू नेते गेले. पवारांचे जवळचे नेते मानले जाणारे आणि आताचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून शरद पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली. यावेळी शरद पवारांनी भुजबळांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात वातावरण निर्माती केली होती. तर दुसरी सभा बीडमध्ये पार पडली. त्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी काही दिवसांनी अजित पवार गटाची देखील बीडमध्ये पहिली सभा पार पडली.

दरम्यान, शरद पवार यांची आंबेगाव सभा होत असेल तर त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मी स्वत: जाईल अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. त्यामुळे आंबेगावात सभा झाली तर शरद पवार दिलीप-वळसे पाटील यांच्याबाबत काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

English Summary: Sharad Pawar will hold a meeting in Ambegaon or Junnar constituency Published on: 27 September 2023, 11:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters