Sharad Pawar On Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते आहेत, असं विधान सकाळी केलं होतं. या विधानानंतर अवघ्या पाच तासांत शरद पवार यांनी यूटर्न घेतला आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान मी केलंच नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुन्हा एकादा तर्कविर्तक चर्चांना उधाण आलं आहे. साताऱ्यात (Satara) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.
शरद पवारांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. पवारांनी असे वक्तव्य करण्यामागे नेमकी कोणती खेळी आहे? पवार असं वक्तव्य करुन का संभ्रम निर्माण करत आहेत? असा सवाल या निमित्ताने केलं जात आहे. तसेच अजित पवार यांना पक्षात पुन्हा संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. पहाटे शपथविधी झाला त्यानंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीतील परत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, "अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही." "आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत," असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.
Share your comments