1. बातम्या

सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

आपण जमिनीचे मालक आहोत हे सिध्य करण्यासाठी सातबारा हा एक पुरावा असतो. पण आता सातबारा बंद होणार आहे. हा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कार्यालयाने घेतला आहे.

7/12 utara

7/12 utara

आपण जमिनीचे मालक आहोत हे सिध्य करण्यासाठी सातबारा हा एक पुरावा असतो. पण आता सातबारा बंद होणार आहे. हा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कार्यालयाने घेतला आहे. आता राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत. त्या ठिकाणी सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड (Property card) सुरू करण्यात येणार आहे.

काय आहे हे प्रॉपर्टी कार्ड

सातबाऱ्यावर ज्या प्रकारे एखाद्या मालकीची शेतजमीनीची माहिती मिळते त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड वर एखाद्या व्यक्तीच्या नावे किती किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती दिली जाते. आपल्या मोबाईल वरून देखील हे डिजिटल (Digital) प्रॉपर्टी कार्ड काढता येऊ शकते. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक आहे.

भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड च्या वापरात सुलभता यावी यासाठी एनआयसी च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. हवेली तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग होणार असून यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टळणार आहे.

आधीच प्रॉपर्टी कार्ड भूमी अभिलेख विभागाने तयार केले होते. पण सातबारा उतारे बंद केले न्हवते यामुळे जागांच्या खरेदी विक्रीच्या ठिकाणी सोयीनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातोय. यातूनच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत म्हणून भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

English Summary: Seventeen transcripts will be closed; Get property card, big decision of Thackeray government Published on: 07 February 2022, 03:09 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters