
photo - shet shivar
मराठवाड्याचा विचार केला तर कायमच दुष्काळात जास्त पट्टा म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. त्यामुळे या विभागामध्ये बागायती शेतीचा विचार करणे एक दिवस सोबत ठरते.
अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कायमच अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र याच आष्टी तालुक्यातील नांदूर या गावचे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचा ध्यास घेऊन नवनवीन पिके घेत आहेत.या गावांमध्ये बारमाही सिंचनाची कुठलीही सुविधा नाही किंवा कुठलाही मोठा प्रकल्प व साठवण तलाव नसल्याने काही वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागत होते.परंतु या बिकट समस्येवर मात करीत येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार यासारख्या सिंचनाच्या साधनाचा वापर करून व जोडीला शेडनेटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन घेऊन समृद्धीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली.
याच गावातील एक प्रगतिशील शेतकरी संजय विधाते यांनी त्यांच्याकडे फसलेल्या माळरानावरील शेतात शेडनेट उभारले. त्यासाठी शासनाकडून त्यांना तब्बल नऊ लाखांचा अनुदानही मिळाले. ह्या शेडनेट मध्ये त्यांनी कॅप्सिकम जातीच्या रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जून महिन्यात वीस गुंठ्यात त्यांनी लाल व पिवळ्या ढोबळी मिरचीची जवळ जवळ पाच हजार रुपी लावली.या रोपांना ठिबक द्वारे फक्त पंधरा मिनिटे पाणी देत असल्यामुळे पाण्याची बचत होऊनतसेच शेडनेटमध्ये चांगले व्यवस्थापन ठेवल्याने पीक ही दर्जेदार आले.
त्यासाठी त्यांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने शेडनेट मधील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत गरजेचे असते. तसेच या पिकासाठी असलेले सापेक्ष आद्रता ही 50 ते 75 टक्के एवढ्या असावी लागते. त्यामुळे पिकाचा दर्जा उत्तम ठेवता येतो. दर आठवड्याला मिरचीचे तोडे चांगल्या प्रमाणात होत असल्याने चाळीस हजारांची विक्री होत आहे. आतापर्यंत उत्पादनाचा विचार केला तर तीन महिन्यात दहा टन एवढे उत्पन्न त्यांना झाली आहे. अजून पुढील चार ते पाच महिने रंगीत मिरचीचे उत्पन्न सुरू राहणार असल्यामुळेअजून नऊ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास विधाते यांना आहे.
यावरून असे दिसते की, शेतीला तंत्रज्ञानाची आणि जबरदस्त इच्छाशक्तीची जोड दिली तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि वेळोवेळी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जर शेती केली तर शेतीला अजून सुगीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
Share your comments