1. बातम्या

‘सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार’

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Minister Meghna Bordikar News

Minister Meghna Bordikar News

परभणीजिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून, रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी आज सेलू येथे दिली. तीन दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता सानप, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम आदी उपस्थित होते.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.

सद्यस्थितीत या सेवा संकल्प शिबिरामध्ये तब्बल सहा हजारावर रुग्णांनी नावनोंदणी केली असून, येथे आलेल्या प्रत्येक‍ रुग्णाच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. रोगाचे निदान करताना एकही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही. मोतीबिंदू तसेच कर्करोगाचे निदान वेळीच करून घ्यावे. त्यासाठी वेळीच प्राथमिक चाचणी करून घ्यावी. सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन करत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की,  रुग्णांनी कर्करोगाची वेळेवर चाचणी, निदान उपचार केल्यास सर्व नागरिक सदृढ राहतील, कोणतीही जीवितहानी होणार नाही. ती टाळता येईल, यासाठी आपण सर्वजण काम करूयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात रुग्णांना डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे उत्कृष्ट सेवा पुरवतील. बोरी आणि जिंतूर येथील 30 बेडच्या रुग्णालयाला 100 बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते उद्घाटन करण्यात येणार असून, येथे कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचा मानसही पालकमंत्र्यांनी बोलून दाखविला. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सेवा संकल्प शिबिर कार्यक्रम ठिकाणी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या. तसेच आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी-नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, वीजबिल कमी येण्यासाठी स्वच्छ पर्यावरणाकरीता सूर्यघर योजना अतिशय चांगली आहे. विशेषत: या योजनेसाठी सबसिडी दिली जाते. प्रत्येकाने आपल्या घरावर या योजनेच्या माध्यमातून सोलार पॅनल लावून सौर ऊर्जेचा वापर करावा. घरातील सर्व उपकरणे या ऊर्जेवर चालतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अवश्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बचतगटांच्या महिलांसह शहर ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. तसेच बचतगटाचे स्टॉलही येथे आहेत. सर्वच स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

English Summary: Seva Sankalp Camp will provide better healthcare facilities to patients in the district Guardian Minister Meghna Bordikar-Sakore Published on: 11 April 2025, 05:36 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters