MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

कौतुकास्पद! एक एकर क्षेत्रावर साकारत आहे शेतकऱ्यांसाठी तणावमुक्ती केंद्र

शेतकरी आणि नैसर्गिक संकटांची मालिका हे एक नित्याचे समीकरण आहे. शेतकरी राजा शेती करत असताना नैसर्गिक संकटांमुळे कष्टाने उभी केलेली पिके त्यांच्या डोळ्यासमोर पाण्यात जात असतात.पिकचनव्हे तर शेतकऱ्यांचे कष्टच पाण्यात विरत असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the farmer

the farmer

शेतकरी आणि नैसर्गिक संकटांची मालिका हे एक नित्याचे समीकरण आहे. शेतकरी राजा शेती करत असताना नैसर्गिक संकटांमुळे कष्टाने उभी केलेली पिके त्यांच्या डोळ्यासमोर पाण्यात जात असतात.पिकच नव्हे तर शेतकऱ्यांचे कष्टच पाण्यात विरत असतात.

कायमच अशा परिस्थितीमुळे शेतकरी तणावात असतात. अगोदरच शेतीसाठी घेतलेली कर्जे आणि नैसर्गिक संकटांमुळे झालेले नुकसान मुळेबरेच शेतकरी कर्ज वेळेवर फेडूशकत नाही. या व अशा अनेक कारणांमुळे शेतकरी प्रचंड तणावात असतात प्रसंगी आत्महत्या सारखीटोकाची गोष्ट पत्करतात. शेतकरी म्हटले म्हणजे जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते.नुसतेम्हटले जात नाही तर शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे. या जगाचा पोशिंदा त्याला नैराश्‍यातून बाहेर काढुन आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावी यासाठी खास शेतकऱ्यांसाठी राज्यातील पहिले छत्रपती संभाजी महाराज शेतकरी तणावमुक्ती  केंद्र आणि आधार केंद्र उभे केले जात आहे.

.हे तणावमुक्ती केंद्र मराठवाडी या ठिकाणी माळरानावर एक एकर क्षेत्रात या शेतकरी तणावमुक्ती  केंद्राचे सर्व अत्याधुनिक सुविधा युक्त बांधकाम होणार आहे.

 कसे असणार हे तणावमुक्ती केंद्र?

 या उभारल्या जाणाऱ्या तणावमुक्ती केंद्रात राज्यभरातून येणारे शेतकऱ्यांसाठी प्रबोधन,विविध पुस्तकांचे वाचन तसेच आध्यात्मिक क्षेत्राचे धडे यासह शेतकऱ्यांचे समाज प्रबोधन करण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. तसेचतणावमुक्ती केंद्रात येणारे शेतकऱ्यांसाठी जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यामागे उद्दिष्ट असा आहे की कितीही संकट शेतकऱ्यांवर आली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग कधीच अवलंबूनये. त्याने त्याचे आयुष्य क्षणभंगुर करू नये हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. 

राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकरी तणाव मुक्ती केंद्र उभे करण्याची संकल्पना पाथर्डी तालुक्यातील घोरपडे यांच्या मनात आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या केंद्राच्या बांधकामास सुरुवात केली. शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणू शकतो या भावनेतून हे केंद्र उभारले जाणार असून सुरुवातीला हे केंद्र स्वखर्चातून सुरू केले जाणार आहे.

English Summary: set up a stress free center for farmer in pathardi taluka in ahemednager district Published on: 22 January 2022, 09:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters