भारतातील प्रमुख व्यवसाय हा शेती असून भारतीय अर्थव्यवस्था मुख्यत्वेकरून शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी आता पारंपरिक पद्धतीची शेती करणे सोडून शेतीला नवनवीन तंत्रज्ञानाची आणि आधुनिकतेची जोड देत आहे. शेतकऱ्यांचा पिके घेण्याच्या बाबतीत ला दृष्टिकोनही बदलला आहे. मग त्यात शेडनेटमधील शेती असो की निरनिराळ्या प्रकारच्या विदेशी भाजीपाल्याची लागवड किंवा औषधी वनस्पती ची लागवड असो या माध्यमातून शेतकरी निरंतर पुढे जाताना दिसत आहे. बरेचसे शेतकरी हे सध्या औषधी पिकांची लागवड करत आहे. यामध्ये जमेची बाजू असली की कमी उत्पादन खर्च वनौषधी वनस्पतींना चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई करत आहेत.
केंद्र सरकारही वेगवेगळ्या प्रयत्नातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. या लेखामध्ये आपण सर्पगंधा ची शेती बद्दल जाणून घेणार आहोत. भारतामधील उत्तर प्रदेश, झारखंड, ओरिसा, तामिळनाडू तसेच महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते. तर मग जाणून घेऊयात सर्पगंधा च्या शेती विषयी माहिती.
सर्पगंधा ची शेती कशी करतात?
मुख्यत्वेकरून ही शेती तीन प्रकारे केली जाते. सर्पगंधा ची कलम बनवून ती तीन पीपीएम च्या इंडोल ऍसिटिक ऍसिड मध्ये 12 तासांपर्यंत बुडवून ठेवली जाते. त्यानंतर ती लावली जाते. दुसऱ्या पद्धतीत सर्पगंधाची मुळे लावले जातात मूळ माती भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवली जातात. त्यानंतर जवळ-जवळ एक महिन्यानंतर सर्पगंधाची मुळे अंकुरित होतात. तिसऱ्या पद्धतीत बियांची पेरणी केली जाते. यामध्ये तिसरी पद्धती सर्वात चांगली पद्धत मानली जाते. यासाठी सरपगंधा च्या चांगल्या बियाण्यांची निवड करणे आवश्यक आहे. नर्सरीमध्ये रूपाला जेव्हा चार ते सहा पाने येतात त्यावेळी त्याची शेतीत लागवड केली जाते. एकदाका सर्पगंधा ची लागवड केली तर कमीत कमी दोन वर्षापर्यंत औषधी वनस्पती शेतात राहते.
सर्पगंधा ला फूल आल्यानंतर फळ आणि बिया तयार होण्यासाठी सोडलं होतं. आठवड्यात दोन वेळा तयार झालेल्या बियांची निवड केली जाते. ही प्रक्रिया जवळजवळ रूप काढण्यापर्यंत सुरू राहते. सर्पगंधाची पानझड झडल्या नंतर ती मुळापासून काढून टाकले जातात. त्यानंतर ती वाळावली जातात. शेतकरी ज्या वेळी याची विक्री करतात त्या वेळी मोठी कमी होते.
सौजन्य -tv9 मराठी
Share your comments