1. बातम्या

मानोली तालुका मानवत येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न

KJ Staff
KJ Staff

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण (आत्मा) कृषि विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ऑगस्‍ट रोजी मौजे मानोली (ता.मानवत) येथे शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास सरपंच ज्ञानोबा शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बँकचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी लटपटे व पी. एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सी. बी. लटपटे यांनी गावातील शेतकरी पुरुषोत्तम शिंदे यांच्‍या शेतावर तुती लागवटीची पट्टा पध्दत, खत  पाणी व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपनासाठी रॅकची रचना आदी विषयी प्रात्यक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले. तसेच कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्‍थापनावर मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांना प्रती एकरी आठ कामगंध सापळे लावण्‍याचा सल्‍ला दिला. 

कापसाच्या डोम कळया गोळा करुन नष्ट करून योग्‍य किटकनाशकाची फवारणीकरावी, फवारणी करतांना डोळयावर गॉगल, हॅन्ड ग्लोज, चेहऱ्यावर मास्क वापरण्याचा सल्ला दिला. डी. डी. भिसे आणि पी. एम. जंगम यांनी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव परिपुर्णरित्या तयार करुनच दाखल करण्याविषयी सुचवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक जी. आर. शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर मांडे यांनी केले तर आभार कृषि विभागाचे श्री. माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुनिल शिंदे, तलाठी अरंविद चव्हाण, शंकर मांडे आदीसह समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters